बॉलीवूडची फॅशन दिवा सोनम कपूर सध्या बॉलीवूडपासून दूर आपल्या पतीसोबत सासरी राहत आहेत. आज ती आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोनम कपूर आणि आनंदने जवळ जवळ ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या आधी अभिनेत्रीच्या हृदयामध्ये आनंद नाही तर काही इतर लोक राज्य करत होते. होय हि गोष्ट खरी आहे कि आनंद आहुजा सोनम कपूरचे पहिले नाही चौथे प्रेम आहे. याआधी तिचे ३ लोकांसोबत अफेयर राहिले आहे.रणबीर कपूर :- सोनम कपूरच्या हृदयामध्ये सर्वात पहिला रणबीर कपूरने एंट्री केली होती. या दोघांनी एकत्र संजय लीला भंसाळीच्या सावरिया चित्रपटामधून डेब्यू केला होता आणि या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सोनम कपूरने या गोष्टीचा खुलासा स्वतः टीव्ही शो कॉफी विद करणमध्ये केला होता कि ती रणबीरवर प्रेम करत होती. पण असे म्हंटले जाते कि रणबीरने दीपिकासाठी सोनमला धोखा दिला होता.पुनीत मल्होत्रा :- रणबीरसोबत ब्रेकअपनंतर सोनमचे नाव प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा भाचा आणि डायरेक्टर पुनीत मल्होत्रासोबत जोडले जाऊ लागले. असे देखील म्हंटले जाते कि दोघांमधील हे नाते जवळ जवळ दोन वर्षे सुरु होते.साहिर बेरी :- रणबीर कपूर आणि पुनीत मल्होत्रा कडून मिळालेल्या धोक्यानंतर तिच्या हृदयामध्ये खास जागा निर्माण केली ती साहिर बैरीने. जेव्हा याच्यासोबतच्या नात्याबद्दल विचारले गेले तेव्हा सोनमने आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला.या सर्वांकडून प्रेमामध्ये धोका मिळाल्यानंतर शेवटी सोनम कपूरने आयुष्यभरासाठी आनंद अहुजाला आपला पती म्हणून स्वीकार केले. आता सोनम आपल्या पतीसोबत एक आनंदी आयुष्य व्यतीत करत आहे. आपल्या अभिनयासोबत सोनम सोशल मिडियावर देखील खूप अॅयक्टिव्ह राहते आणि नेहमी आपले फोटो शेयर करून चाहत्यांसोबत संपर्कामध्ये राहते. लॉकडाऊन दरम्यान सोनमने घरातील स्टडी रूमपासून लॉन, वर्क स्टेशन, किचन, बेडरूमपर्यंत सर्व फोटो चाहत्यांसोबत शेयर केले होते. या फोटोंना सर्व लोकांनी खूपच पसंती दिली होती. याशिवाय सोनमने एक आणखी फोटो शेयर केला होता ज्यामध्ये ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत होती.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.