सोनम कपूरच्या चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’, कपूर कुटुंबामध्ये छोट्या राजकुमारचे आगमण, मसक्कली गर्ल बनली आई…

2 Min Read

मनोरंजन जगतामधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या घरी छोट्या राजकुमारचे आगमन झाले आहे. याबद्दल स्वतः रणबीर कपूरची आई नीतू कपूरने सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे. नीतू कपूरने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. जी अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या वतीने आहे. शेयर केलेल्या पोस्टनुसार अभिनेत्रीने शनिवारी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला आहे.

नीतू कपूरने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे कि २० ऑगस्ट २०२२ रोजी आमच्या घरी मुलाचे स्वागत झाले आहे. या सुंदर क्षणी आम्हाला साथ देण्यासाठी डॉक्टर्स,नर्सेज, मित्रपरिवार आणि कुटुंबातील सर्वांचे आभार. हि फक्त एक सुरुवात आहे. पण आम्हाला माहित आहे कि आता आमचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे.
सोनम कपूरने याच वर्षी मार्चमध्ये आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. यानंतर ती सोशल मिडियावर नेहमी आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली होती. तर जून महिन्यामध्ये सोनम कपूर इटलीमध्ये बेबी शॉवर ठेवले होते. ज्यामध्ये तिचे जवळचे मित्र सामील झाले होते. यानंतर मुंबईमध्ये देखील तिचे बेबी शॉवरचे नियोजन करण्यात आले होते जे नंतर रद्द करण्यात आले.

सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद आहुजा या व्यावसायिकासोबत मुंबईमध्ये धुमधडाक्यात लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर तिने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा करत बेबी बंप सोबत आपला एक फोटो शेयर केला होता. अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीची बातमी समोर आल्यानंतर चाहते या क्षणाची आतुरतने वात पाहत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

बॉलीवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक सोनम कपूर प्रेग्नंसीमध्ये देखील आपले फॅशन गोल सेट करताना दिसली. तिच्या मॅटर्निटी शूटचे फोटोही देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता कपूर कुटुंबामध्ये छोट्या राजकुमारचे आगमण झाल्यामुळे सर्वच आनंदी आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *