आजदेखील भारतीय समाजामध्ये महिलांच्या मासिक पाळीबद्दल बोलणे देखील वाईट समजले जाते. मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. जर एखादी महिला मासिक पाळीबद्दल बोलत असेल तर घरामधील इतर सदस्य त्याला विरोध करतात. इतकेच नाही तर मासिक पाळीदरम्यान महिलांवर अनेक निर्बंध लावले जातात.

अशामध्ये बदलत्या काळामध्ये सामान्य महिलांपासून ते बॉलिवूड अभिनेत्रींना देखील याचा सामना करावा लागतो असा धक्कादायक खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरने केला आहे. अभिनेत्रींना देखील अशा निर्बंधांममधून जावे लागते असे देखील ती म्हणाली.

सोनम कपूरने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा करताना म्हणाली कि मी जेव्हा १५ वर्षाची होते तेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. त्यावेळी मला घरामधील काही ठिकाणी जाण्यास निर्बंध लावले गेले होते. माझी आजी मला स्वयंपाक घरामध्ये, देवघरामध्ये जाण्यास विरोध करायची. ज्या ठिकाणी लोणचं ठेवलेले असायचे तिथे देखील मला जाऊ दिले जात नव्हते.

मी मुंबई सारख्या ठिकाणी लहानाची मोठी झाले तरी देखील मला हे सर्व सहन करावे लागले होते मग विचार करा कि ग्रामीण भागामध्ये मुलींची काय अवस्था होत असेल. त्यांना काय काय सहन करावे लागत असेल. काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने देखील यावर भाष्य केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

दरम्यान अभिनेत्री सोनम कपूरनेच नाही तर आलिया भट्ट, करीना कपूर, राधिका आपटे आणि श्रद्धा कपूर यांनी देखील भाष्य केले आहे. या अभिनेत्रीनी त्यांच्या मासिक पाळी दरम्यानच्या अनुभवाविषयी सांगितले आहे.