बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सु*सा*इ*डनंतर सिंगर सोनू निगमने मोठा खुलासा केला आहे. सोनू निगमचे म्हणणे आहे कि संगीत जगतामधून देखील लवकरच आ*त्म*ह*त्येची बातमी येऊ शकते. प्रसिद्ध सिंगर सोनू निगमच्या या खुलास्यानंतर पुन्हा एकदा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री हैराण आहे. सोनूने एक व्हिडिओ पोस्ट करून अनेक खुलासे केले आहेत.बॉलीवूड प्लेोबॅक सिंगर सोनू निगमने म्युजिकच्या जगतामधून नवीन सिंगर्सच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ प्रसिद्ध करुन त्याने संगीत जगतातील माफियाला लक्ष्य केले आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगमने सांगितले आहे कि कशाप्रकारे एक दोन लोकांनी संपूर्ण म्युजिक इंडस्ट्रीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सोनूचा आरोप आहे कि हे लोक निश्चित करतात कि कोणाला गायचे आहे आणि कोणाला नाही.
आज अभिनेता मेला आहे उद्या सिंगर मरेल :- व्हिडिओ शेयर करताना सोनू निगमने म्हंटले आहे कि – आज सुशांत सिंह राजपूत मेला आहे. एक अभिनेता मेला आहे. उद्या तुम्ही एखाद्या सिंगरबद्दल असे ऐकू शकता. संगीत जगतामध्येदेखील माफियाचे वर्चस्व आहे. खरे तर माझा मूड नव्हता कारण सुशांतच्या जाण्याने संपूर्ण देश मेंटल आणि इमोशनल प्रेशर मधून जात आहे. दुख होने स्वाभाविक आहे कारण एक तरुण व्यक्तीला जाताना पाहणे खूप अवघड आहे. कोणी निर्दयीच असेल ज्याला काही फरक पडत नाही.
चित्रपटांपेक्षा मोठा माफिया म्युजिकमध्ये आहे :- सोनू निगमने म्हंटले कि देशामध्ये चित्रपटांपेक्षा मोठा माफिया राज म्युजिक इंडस्ट्रीमध्ये आहे. मी लकी आहे कि खूपच कमी वयामध्ये येथे आलो आणि यांच्या तावडीमधून सुटलो, पण नवीन लोकांना येथे स्थान निर्माण करने खूपच अवघड आहे. सोनूने पुढे म्हंटले कि माझ्यासोबत खूप नवीन लोक बातचीत करतात कि त्यांच्यासोबत काम करण्यासाठी निर्माता, दिग्दर्शक, कंपोजर तयार आहेत पण म्युजिक कंपनी तयार नाही. सोनूने असे भेदभाव करणाऱ्या लोकांना म्हंटले कि मी समजतो कि तुम्ही खूप मोठे लोक आहात, म्युजिक जगतावर राज्य करता, पण असे करू नका हि खूप वाईट गोष्ट आहे.
सलमानवर साधला निशाना :- सोनू निगमने म्हंटले कि मी नवीन सिंगर्स, नवीन कंपोजर्स, नवीन गीतकार यांच्या डोळ्यांमध्ये स्वप्ने पाहिली आहेत आणि त्यांच्या पूर्ण न होण्याच्या वेदना पाहिल्या आहेत. ते उघडपणे व्यक्त होतात. जर ते मेले तर तुमच्यावर देखील प्रश्न उपस्थित होतील. त्याने पुढे अरिजीत सिंहवरून सलमान खानवर निशाणा साधला. त्याने म्हंटले कि – आज दोन कंपन्यांच्या हातामध्ये ताकद आहे. माझी गाणी कोणी दुसरा ठरवतो. तर अभिनेता ज्याच्यावर आज लोक बोट दाखवत आहेत तो म्हणतो कि याच्याकडून गाणे गाऊन घेऊ नका. त्याने अरिजीत सिंह सोबत देखील हेच केले.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.