जेव्हा नयनताराने फोनवर प्रभुदेवाच्या पत्नीकडे मागितली होती त्यांच्या लग्नासाठी परवानगी !

3 Min Read

साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता प्रभुदेवाने आपल्या फिल्मी करीयरची सुरवात बॅकग्राऊंड डांसर म्हणून केली होती आणि हळू हळू फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता त्याने फिल्म प्रोड्युसर आणि ऍक्टर म्हणून ओळख बनवली आहे. आपल्या डांस आणि कामाशिवाय प्रभू देवा आपल्या पर्सनल लाईफ आणि अफेयरमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिला आहे. आज आम्ही तुम्हाला प्रभू देवाच्या आयुष्यामधील असाच एक किस्सा सांगणार आहोत जो त्याची गर्लफ्रेंड नयनताराशी संबंधी आहे ज्यावेळी नयनताराने प्रभूदेवाच्या पत्नीकडे त्यांच्या लग्नासाठी फोनवरुन परवानगी मागितली होती.

मिडियात अशी चर्चा राहिली होती कि, १९९५ मध्ये जेव्हा प्रभुदेवाने लता सोबत लग्न केले होते तेव्हा त्यांना तीन मुले देखील झाली. तथापि २००८ मध्ये कॅन्सरमुळे मुलगा विशालचे निधन झाले होते. या कुटुंबाची तुटण्याची स्टोरी तेव्हा सुरु झाली जेव्हा प्रभूदेवाच्या लाईफमध्ये नयनताराची एंट्री झाली होती आणि बघता बघता परिस्थिती इतकी वाईट झाली कि प्रभुदेवाने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.असे म्हंटले जाते कि लताने आपले लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण तसे झाले नाही. लता त्यादरम्यान आपल्या या रिलेशनशिपबद्दल मिडियाशी बातचीत करत होती. त्यादरम्यान तिने म्हंटले कि नयनताराने तिला फोन करून प्रभुदेवाच्या दुसऱ्या लग्नासाठी तिच्याकडे परवानगी मागितली होती. या मुलाखतीमध्ये तिने हे सुद्धा सांगितले कि कसा नयनताराचा फोन येत होता आणि प्रभुदेवा घरामध्ये एक क्षणदेखील थांबत नव्हता.तिने हे देखील सांगितले कि त्यांच्या मुलाच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी तो घरातून बाहेर पडला आणि असे त्याला नयनताराने करण्यास सांगितले होते. तिचा हादेखील आरोप होता कि नयनतारानेच प्रभुदेवाला त्यांच्या फॅमिलीला पैसे देण्यास मनाई केली आणि त्यानंतरच त्यांनी फॅमिली कोर्टात धाव घेतली जेणेकरून त्यांना हक्क मिळावा. असे म्हंटले जाते कि पहिल्यांदा सलोख्याची अपील घेऊन लता कोर्टात पोहोचली होती आणि धमकीसुद्धा दिली होती कि जर त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर ती उपोषणाला बसेल. लताला घटस्फोट देऊन नयनतारासोबत लग्न करणाऱ्या प्रभुदेवाच्या आयुष्यामध्ये असे वळण आले कि नयनतारासुद्धा त्याच्यापासून वेगळी झाली. २०१५ मध्ये नयनताराने विग्नेश शिवनसोबत लग्न केले.२००९ मध्ये प्रभू देवा आणि तमिळ अभिनेत्री नयनताराच्या रोमांस आणि डेटिंगच्या अफवा समोर येऊ लागल्या. प्रभू देवाने तमिळ चित्रपट विल्लूचे दिग्दर्शन केले ज्यामध्ये नयनतारा मुख्य भूमिकेमध्ये होती. तथापि दोघांनी कधीच आपले संबंध स्वीकार केले नाही. असे सद्धा म्हंटले जाते कि दोघे बरीच वर्षे लिवइनमध्ये राहिले होते. प्रभुदेवासाठी नयनताराने आपला ईसाई धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. आता दोघांचेही मार्ग वेगळे आहेत. पण तरीही नयनताराने आपल्या त्या टॅटूला अजून हटवले नाही. त्याला मॉडिफाय जरूर केले. त्याचे रंग रूप बदलले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *