८० आणि ९० च्या दशकामधील श्रीदेवी बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींच्यापैकी एक राहिली आहे. श्रीदेवी भलेहि आज या जगामध्ये नाही पण आपल्या चित्रपटांद्वारे ती आजसुद्धा फॅन्सच्या हृदयामध्ये आहे. श्रीदेवीला बॉलीवूडमधील पहिली फिमेल सुपरस्टार मानले जाते. श्रीदेवीने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे पण ज्या काळामध्ये अमिताभ बच्चन आपल्या करियरच्या शिखरावर होते तेव्हा श्रीदेवीने त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.बॉलीवूडचे महानायक आणि शहंशाह अमिताभ बच्चन त्यांच्या काळामधील सुपरस्टार राहिले आहेत आणि एक काळ असा होता कि कोणतीही अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्यास कधीच नकार देत नव्हती. परंतु श्रीदेवी अशी पहिली अभिनेत्री होती जिने अमिताभ बच्चन सोबत काम करण्यास नकार दिला होता. श्रीदेवीने अनेकदा चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सोबत काम करण्यास नकार दिला होता. बॉलीवूड मधील इतक्या मोठ्या करियरमध्ये दोघांनी फक्त तीनच चित्रपटांमध्ये काम केले. इंकलाब, आखिरी रास्ता आणि खुदागवाह हे त्यापैकी तीन चित्रपट आहेत. त्यानंतर २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारली होती पण या चित्रपटामध्ये ते कॅमियो रोलमध्ये पाहायला मिळाले होते.
१९९१ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट अजूबामध्ये श्रीदेवीची निवड करण्यात आली होती परंतु श्रीदेवीने या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. याचा खुलासा स्वतः श्रीदेवीने एका मुलाखतीदरम्यान दिला होता. श्रीदेवीने सांगितले कि तिला एक प्रकारच्या भूमिका दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर करायच्या नव्हत्या. त्याचबरोबर तिचा रोल चित्रपटामध्ये हिरोपेक्षा कमी नसला पाहिजे. शशी कपूरचा चित्रपट अजूबासोबत सुद्धा असेच झाले होते. शशी कपूरने अमिताभच्या विरुद्ध श्रीदेवीला अप्रोच केले होते पण तिने याला साफ नकार दिला होता. या भूमिकेमध्ये काही खास नव्हते. नंतर हि भूमिका डिंपल कपाड़ियाला देण्यात आली. यानंतर जेव्हा तिच्याकडे खुदा गवाह हा चित्रपट आला ज्यामध्ये अमिताभसुद्धा मुख्य भूमिकेमध्ये होते त्यावेळी श्रीदेवीने यासाठी तयारी दर्शवली.