दिव्या भारतीने विश्वात्मा चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. दिव्या भारती फिल्म इंडस्ट्रीमध्ये येताच असे म्हंटले जाऊ लागले कि ती श्रीदेवीची जागा घेईल. दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ मध्ये झाला होता. दिव्या भारतीच्या एका चित्रपटामध्ये तिच्या जागी श्रीदेवीला घेण्यात आले होते.

लाडला चित्रपट तर तुम्हाला माहितीच असेल. या चित्रपटासाठी सर्वप्रथम दिव्या भारतीला साईन करण्यात आले होते. चित्रपटाचा काही भागदेखील शूट करण्यात आला होता. परंतु अचानक दिव्या भारतीच्या निधनामुळे श्रीदेवीला चित्रपटामध्ये घेण्यात आले. दिव्या भारती सोबत शूट केलेला व्हिडिओचा एक भाग देखील यूट्यूबवर आजही उपस्थित आहे.या व्हिडिओमध्ये दिव्या भारती आणि अनिल कपूर यांच्यामध्ये काही कारणामुळे फॅक्टरीमध्ये वाद होतात. व्हिडीओमध्ये दिव्या भारतीला पाहिल्यानंतर असेच वाटते कि ती श्रीदेवीच आहे. या चित्रपटामध्ये श्रीदेवी शिवाय रविना टंडनसुद्धा होती. चित्रपटाचे शुटींग जेव्हा ६ महिन्यानंतर पुन्हा सुरु केले गेले तेव्हा सेट विचित्र घटना घडल्या होत्या.एका सीनमध्ये श्रीदेवी सोबत शक्ती कपूर आणि रविना टंडन होते. श्रीदेवी सारखी त्याच ठिकाणी अडकत असे जिथे दिव्या भारती अडकत होती. रविना आणि शक्ती कपूर यामुळे खूपच घाबरले होते. दिव्या भारतीने लाडला शिवाय मोहरा, विजयपथ सारखे अनेक चित्रपट साईन केले होते. परंतु ती हे चित्रपट करू शकली नाही. दिव्या भारतीचे अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले.