बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या करियरमध्ये जवळ जवळ ३०० चित्रपटांमध्ये काम केले होते. ती आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी आपल्या चित्रपटामध्ये को-स्टारला जास्त फुटेज मिळाल्यानंतर डिस्टर्ब व्हायची. काही रिपोर्टनुसार मानले तर हेच कारण होते कि श्रीदेवी मेकर्सला सांगून आपल्या को-स्टार्सचे सीन काढून टाकायची ज्यांच्याबद्दल तिला वाटायचे कि यांना जास्त फुटेज मिळाले आहे.असेच काही १९९३ मध्ये झाले होते ज्यावेळी गुमराह चित्रपटाची शुटींग चालू होती. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्टने केले होते आणि त्या काळातील सर्वात चर्चित चित्रपटांमधील हा एक चित्रपट होता. तथापि रीमा श्रीदेवीपेक्षा फक्त ५ वर्षाने मोठी होती पण असे असूनही ती चित्रपटामध्ये श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारत होती.जेव्हा श्रीदेवीने ईडिटिंगवेळी चित्रपट पाहिला तेव्हा तिला वाटले कि रीमा लागूच्या अभिनयासमोर ती फिकी पडत आहे तेव्हा तिने या चित्रपटामधून रीमा लागूचा सीन काढून टाकण्यासाठी सांगितले. कारण त्यावेळी श्रीदेवीचे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे नाव होते. तिचे बहुतेक सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट व्हायचे. यामुळे तेव्हा मेकर्सला सुद्धा तिची हि गोष्ट माणावी लागली होती आणि रीमाच्या या सीनला काही प्रमाणात ट्रिम करण्यात आले होते.श्रीदेवीने जुली या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एक बालकलाकार म्हणून एंट्री केली होती. श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने सुद्धा धाडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली आहे जो एक मराठी चित्रपटाचा रिमेक आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतला होता. दुबई मध्ये ती आपला भाचा मोहित मारवाच्या लग्नामध्ये सामील होण्यासाठी गेली होती. जिथे तिचा बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता. श्रीदेवीने हिंदी चित्रपटांशिवाय तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम, कन्नड भाषेच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. २०१३ मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.