करीना झाली कपूर खानदानातील मुलगी असली तरी ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. करीनाचा नुकताच गुड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला. ती सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच कमाई करत आहे. करीना कपूर सैफ अली खानसोबत लग्न केले होते. सैफ चे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न अमृता सिंह सोबत झाले होते. करीना व सैफला एक गोड मुलगा झाला. त्याचे नाव दोघांनी मिळून तैमुर असे ठेवले.

तैमुर संबंधित अनेक बातम्या सारख्या समोर येत असतात परंतु आज आम्ही तुम्हाला या लेखातून तैमूरच्या बुटाची किंमत सांगणार आहोत. एक एवढुसा चिमुरडा मुलगा एवढे महागडे बुट घालतो हे वाचुन तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. याच बरोबर आम्ही तुम्हाला स्टार किड्स कपड्यांची किंमत देखील सांगणार आहोत.
सर्वात आधी बोलूया बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानच्या मुलांबद्दल. शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा त्याच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख देखील त्याच्या मुलावर खर्च करण्यासाठी कंजूसी दाखवत नाही. काही दिवसापूर्वीच आर्यन खान एका डेनिम जॅकेटमध्ये दिसला होता. ते जॅकेट बालमियम ब्रँडने बनवले होते. त्या जॅकेटची किंमत ८९ हजार रुपये इतकी होती.श्रीदेवी आणि बोनी कपूरची मोठी मुलगी जान्हवी कपूर देखील महागड्या कपड्यांचा वापर करते. जान्हवी ने देखील काही दिवसांपूर्वी निळा रंगाचे स्टायलिश जॅकेट घातले होते त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये इतकी होती. सैफ अली खान व अमृता सिंहच्या मुलीबद्दल म्हणजेच सारा खान बद्दल बोलायचे झाले तर केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशना दरम्यान साराने एक पिवळ्या रंगाचा टॉप घातला होता. त्याची किंमत ५० हजार रुपये इतकी होती.

आता आम्ही तुम्हाला करिनाचा मुलगा तैमूर बद्दल सांगणार आहोत. करीना व सैफ त्यांच्या मुलाचे पालनपोषण व संगोपण उत्तम रित्या करतात. तैमुर ची देखभाल करण्यासाठी जी नेनी ठेवली आहे तिचाच पगार जवळजवळ लाखोच्या घरात आहे. तैमूरच्या कपड्यांपासून ते त्याच्या बुटांना पर्यंत त्याचे आई-वडील त्याच्यावर खूप खर्च करतात. काही दिवसांपूर्वीच तैमुरने लाल पट्टी असलेले बूट घातले होते. हे बुट नामांकित कंपनी गुची ने बनवले होते. या नुसत्या बुटाची किंमत तब्बल चौदा हजार रूपये इतकी होती. एवढेच नाही तर त्याच्या छोट्या छोट्या कपड्याची किंमत देखील हजारो रुपये असते.