जगातल्या विभिन्न देशांनी आपली गरज आणि संस्कृती प्रमाणे काही सेवा, खानपान आणि फॅशन वर प्रतिबंध लावला आहे. काहींनी जीन्स वर प्रतिबंध लावलाय तर काहींनी गुगल, फेसबुक आणि उबेर सारख्या कंपन्यांवर ही प्रतिबंध लावलेला आहे. चला ह्या लेखा मध्ये वाचूयात अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांवर काही देशांनी प्रतिबंध लावलेला आहे. जगात लावलेल्या प्रतिबंधांपैकी काही प्रतिबंध खालील प्रमाणे आहेत.

१) उत्तर कोरिया मध्ये निळ्या जीन्स वर प्रतिबंध :- उत्तर कोरिया आपले सर्वोच नेता किम जोंग ऊन च्या तानशाही निर्णयांमुळे कुप्रसिद्ध आहे. किम जोंग ऊन ने आपल्या देशाच्या संस्कृतीला बढावा देण्यासाठी अमेरिकेविरुद्ध चालू असलेल्या शीत युद्धा मुळे स्वतःच्या देशात २०१६ पासून वेस्टर्न स्टाईल असलेल्या निळ्या जीन्स वर प्रतिबंध घातला. पण इथे काळी जीन्स घालण्यास कोणताही प्रतिबंध नाही आहे. असे असले तरी विदेशी पर्यटकांसाठी निळी जीन्स घालण्यास येथे परवानगी आहे.२) चीन मध्ये गुगल वर प्रतिबंध :- चीन ने २००९ मधेच गुगल ला त्यांच्या देशात बॅन केले होते. त्याचा तात्कालिक कारण होते कि युट्युब वर एक व्हिडीओ दाखवला जात होता ज्यामध्ये चिनी सैनिक तिबेटी नागरिकांना मारत असल्याचे दाखवले गेले होते. ह्या व्यतिरिक्त चीन ने गुगल ला ती अमेरिकन कंपनी असल्यामुळे पण बॅन केले आहे. चीन ला वाटते कि गुगल चीन च्या राष्ट्रीय सुरक्षे संबंधित माहिती अमेरिकेला पुरवतो. चीन मध्ये त्यांची स्वतःची सर्च इंजिन बायडू वापरली जाते.३) भारतात नागरिकांनी “जारवा जनजातींशी” भेटण्यास प्रतिबंध :- भारतात केंद्रशासित प्रदेश अंदमान मध्ये राहणारी “जारवा जनजाती” मानव सभ्यतेच्या सर्वात जुन्या जनजातींपैकी एक आहे. अंदमान ची “जारवा जनजाती” हिंद महासागरातल्या बेटांवर मागील ५५००० सालांपासून वास्तव्य करत आहे. जारवा जनजातीचे लोक आफ्रिकेहून हजारो वर्ष अगोदर येथे येऊन वसले होते. भारत सरकारने सध्याच्या आधुनिक संस्कृतीचा त्यांच्या संस्कृतीशी प्रभाव पडू नये म्हणून सामान्य नागरिकांना ह्या जनजातींशी भेटण्यावर प्रतिबंध लावलेला आहे.४) बल्गेरिया मध्ये उबेर वर प्रतिबंध :- बल्गेरिया च्या एयरपोर्ट वर उतरल्यानंतर तुम्हाला पिकअप आणि ड्रॉप ची सुविधा उबेर कडून मिळणार नाही कारण येथे उबेर बॅन आहे. उबेर वर प्रतिबंध लावण्याचा आदेश तिथे सुप्रीम कोर्टाने २०१५ मध्ये दिला होता. उबेर ने येथे ड्रायव्हर्स ना लायसन्स शिवाय टॅक्सी चालवण्याची मुभा दिली होती त्यामुळे उबेर ला पूर्ण देशात बॅन करण्यात आले. उबेर, आपल्या ड्रायव्हर्स ना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम देतो त्यामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांची कोणतीही जबाबदारीही घ्यावी लागत नाही. ज्यामुळे उबेरला टॅक्स, ओव्हरटाईम बेनिफिट्स सारख्या गोष्टी चुकवाव्या लागत नसल्याने कंपनीला फायदा होतो. उबेर हंगेरी, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क सारख्या देशातही बॅन आहे.५) युरोप मध्ये बुरख्यावर प्रतिबंध :- देशात सुरक्षेवर भर देण्यासाठी युरोपातल्या बर्याचश्या देशांनी मुस्लिम महिलांनी बुरखा घालण्यास प्रतिबंध लावला आहे. बुरख्यावर प्रतिबंध लावणारा पहिला देश फ्रांस होता, २००४ मधेच फ्रांस ने बुरखाबंदी केली होती. त्यानंतर बेल्जीयम, स्वित्झर्लंड, स्पेन, इटली, टर्की आणि नेदरलँड नी सुद्धा आपल्या देशांत प्रतिबंध लावलेला आहे.६) सिंगापूर मध्ये चुईन्ग्म बॅन :- दक्षिण पूर्व आशियामध्ये सिंगापूर ह्या देशात चुईन्ग्म खाताना आढळलात तर तुम्हाला अटक होऊ शकते. इथे केवळ चिकित्सकीय कामांसाठी चुईन्ग्म खाण्याची परवानगी आहे. इथल्या सरकारने २००४ मध्ये चुईन्ग्म खाण्यावर प्रतिबंध आणले होते. देशात साफ सफाई वर भर देण्यासाठी सरकार ने चुईन्ग्म व्यतिरिक्त थुकणे, नाक शिंकरणे, रस्तात लघुशंका करणे ह्या सारख्या गोष्टींवरही प्रतिबंध लावला आहे.७) भुटान मध्ये स्मोकिंग वर प्रतिबंध :- २२ फेब्रुवारी २००५ रोजी भुटान मध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी घालण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालणारा भुटान पहिला देश ठरला आहे. भुटान तंबाखू नियंत्रण अधिनियम १६ जून २०१० साली संसदेमध्ये पारित करण्यात आला.
८) नॉर्वे मध्ये रेडिओ प्रसारणावर प्रतिबंध :- रेडिओ वर बंदी घालणारा नॉर्वे हा पहिला देश ठरला आहे. ११ जानेवारी २०१७ रोजी नॉर्वे ने अनलॉग फ्रिक्वेन्सी द्वारे होणाऱ्या प्रश्र्नावर बंदी घातली आहे. रेडिओ वर प्रतिबंध लावण्याचे मुख्य कारण पूर्ण लोकसंख्येला रेडिओ सेवा इंटरनेट च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पुरवण्याचा नॉर्वेचा मानस होता.
९) मलेशिया मध्ये पिवळे कपडे घालण्यावर प्रतिबंध :- फेब्रुवारी २०१६ मध्ये प्रधानमंत्री नजीब रजाक ह्यांच्या राजीनाम्याची मागणी करताना पिवळे कपडे घालून लोकांनी प्रदर्शन केले होते. तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्यांनी पिवळे कपडे घालण्यावर प्रतिबंध लावला. आता मलेशियात पिवळे कपडे विरोधाचे प्रतीक मानले जाते जसे भारतात काळ रंग हा विरोधाचे प्रतीक मानला जातो.
१०) इराण मध्ये वेस्टर्न हेयरस्टाईल वर प्रतिबंध :- इराण च्या सरकार ने वर्ष २०१० मध्ये वेस्टर्न लुक असलेल्या हेयरस्टाईल्स वर बंदी घातली आहे. त्यामध्ये स्पाईक्स, शेंडी, मलेट टाईप ची केशरचना असलेले केस ठेवण्यावर बंदी आहे. एवढेच नाही तर सरकारने सलून्स ना कॅटलॉग सुद्धा पाठवले आहेत ज्यामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत कि केस कसे ठेवायचे आहेत आणि कसे नाही. जो हा नियम तोडेल त्याला कैद किंवा दंड भरावा लागतो.
माहिती आवडली असल्यास लाईक करून शेयर करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.