जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हापासून त्याच्यावर चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या याबाबत संस्कार केले जातात. या संस्कारांमुळेच त्या मुलाला चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या याची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागते. मग याच कारणांमुळे आपण मुलांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करतो. यामागे आपल्या मुलांना वाईट संगत लागू नये, ते वाईट गोष्टींच्या आहारी जाऊ नयेत हाच आपला प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यामुळे आपण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात कशा देता येतील याचा विचार करु लागतो. त्यांनी वाईट गोष्टींपासून दूर राहावं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या हीच आपली इच्छा असते.

याच मर्यादांमुळे मुलांना एखादी गोष्ट आपल्यासाठी वाईट असेल तर त्याबाबत जाणीव होत असते आणि ही जाणीव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. अशा काही वाईट सवयी आहेत ज्या मुळात चांगल्या आहेत.

1.टीव्ही आपल्याला क्रिएटिव बनवतो –

www.clinicaladvisor.com

टीव्ही बघायला कोणाला आवडत नाही, मग ती मुलं असोत किंवा मुलांचे पालक किंवा कोणतीही व्यक्ती असो टीव्ही पाहणे प्रत्येकालाच आवडत असते. असं असलं तरीही लहानपणापासूनच आपण मुलांना शिकवत असतो कि टीव्ही कमी पाहावा. अधिक काळ टीव्ही पाहिल्यामुळे आपला खूपच वेळ खर्च होतो. मात्र टीव्ही पाहिल्यामुळे ताणतणाव कमी होतो ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल. त्यामुळे टीव्ही नक्की पाहा मात्र ताणतणाव निर्माण करतील असे प्रोग्राम कधीही पाहू नका. ज्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात भर पडेल, ज्या प्रोग्राममुळे आपल्याला क्रियेटीव्ह आयडिया मिळतील असे प्रोग्राम निश्चित पाहावेत.

2. फास्ट फूड वजन कमी करण्यास मदत करते –

https://news.yale.edu

जेव्हा केव्हा फास्टफूडचा विषय निघतो तेव्हा फास्ट फूड खाण्यासाठी मुलांना नेहमीच मनाई केली जाते. कारण ते खाल्ल्यामुळे आरोग्यास नुकसान पोहोचते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की फास्ट फूड त्यांच्यासाठी चांगलं आहे, ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असते. कारण हे वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि हे खाल्ल्यामुळे भूक देखील कमी लागते.

3. उशिरापर्यंत झोपणे देखील आहे फायदेशीर –

http://storage-cube.quebecormedia.com

आपल्याला लहानपणापासूनच हे शिकवले जाते की उशिरापर्यंत झोपणे अरोग्यासाठी चांगले नसते. ही सवय आपल्याला नसावी. मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, म्हणूनच याची दुसरी बाजू अशी आहे की ज्या व्यक्ती उशिरापर्यंत झोपतात त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ होते आणि नवीन काहीतरी शिकण्याची क्षमता देखील वाढत जाते. असं असलं तरी प्रत्येकाने इतक्याही उशिरापर्यंत झोपू नये की ज्यामुळे आपल्याला आपली महत्त्वाची कामे करता येणार नाहीत.

4. मौजमजा आणि बागडणे देखील आहे फायदेशीर –

http://growfoundationva.org

मुलांनी नेहमी ॲक्टिव राहण्यासाठी खेळात भाग घेणे आवश्यक असते. मात्र लहान मुलं जी मजा मस्ती करतात, तेव्हा त्यांचे पालक म्हणून आपण त्यांना ओरडत असतो. त्यांना एका जागी शांत बसण्यास सांगतो, मात्र आपण वारंवार त्यांना हे असे करण्यास सांगत असू तर मुलं सुस्त होतात. मौजमजा केल्याने, मैदानी खेळ खेळल्याने त्यांचे शरीर ऍक्टिव्ह राहते आणि त्यांचे वयोमान देखील वाढते.

5. मोठ्या आवाजात गाणी ऐकणे देखील चांगले –

https://cdn.redsharknews.com

जेव्हा आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहत असू तेव्हा बऱ्याचदा कमी आवाजात गाणे ऐकण्याचा सल्ला एकमेकांना दिला जातो. मात्र तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण केलंत तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल, ती गोष्ट म्हणजे मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यामुळे तुम्ही त्यात रममान होता आणि तुमचा ताणतणाव कमी होतो.

6. कॉफी पीने देखील आहे फायदेशीर –

https://images-prod.healthline.com

ज्या व्यक्तींना चहा पिण्याची खूप सवय आहे त्यांनी देखील चहाऐवजी कॉफी पिण्याची सवय केली पाहिजे. या सवयीमुळे अवेळी येणारी झोप तर उडतेच याशिवाय डायबिटीजचा धोकादेखील कमी होतो याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा देखील मिळते.

काय मग होत्या ना तुमच्या मनात देखील या सहा गोष्टींबाबत शंका, की नेमक्या त्या वाईट आहेत की चांगल्या. आज आम्ही तुम्हाला या सहा वाईट सवयींबद्दल सांगितले ज्या खरंतर चांगल्या आहेत. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आपल्या मित्र मैत्रिणींना अशा सवयी असतील तर नक्की त्यांच्यासोबत आमचा हा लेख शेअर करा.