बॉलीवूडमध्ये अभिनेता सुनील दत्त यांना एक चांगला माणूस म्हणून ओळखले जात होते. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपला मुलगा संजय दत्तला काम मिळवून देण्यासाठी अनेक निर्मात्यांना शिफारस देखील केली होती. तेव्हा कुठे संजय दत्तला काम मिळायला सुरवात झाली.सुनील दत्तच्या शिफारशीनंतर संजय दत्तला विधाता हा चित्रपट मिळाला होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. या चित्रपटाच्या यशानंतर संजय दत्तच्या स्वभावामध्ये खूप बदल होऊ लागले. दुसऱ्या चित्रपटाची शुटींग सुरु करण्यापूर्वी संजय दत्त निर्मात्यांपुढे हि अट ठेऊ लागला कि शुटींग तेव्हाचा पूर्ण होईल जेव्हा त्याला नशेचे पदार्थ खावू दिले जातील. संजय दत्तच्या या सवयीमुळे निर्माते संजय दत्त सोबतच त्याचे वडील सुनील दत्त पासून देखील अंतर ठेऊ लागले.
सुनील दत्तला जेव्हा असे वाटले कि संजय दत्त मुळे त्यांना सुद्धा चित्रपटामध्ये काम मिळणे कठीण होईल तेव्हा त्यांनी नाईलाजास्तव निर्माता आणि दिग्दर्शकांना सांगितले कि त्यांनी संजय दत्तला आपल्या चित्रपटामध्ये काम देऊ नये. त्यामुळे संजय दत्तला चित्रपटामध्ये काम मिळणे कठीण होऊ लागले. जेव्हा संजय दत्तला हे समजले कि चित्रपटामध्ये काम न मिळण्याचे कारण आपले वडील सुनील दत्त आहेत तेव्हा तो सुनील दत्त यांच्यावर नाराज झाला आणि तो त्यांना आपला शत्रू समजू लागला.