कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये तीन मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन यशस्वी व्हावा यासाठी प्रत्येक राज्याचे सरकार कार्यरत आहे. त्याकरिता ९०च्या दशकातील रामायण ही मालिका सुरु केली गेली. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे प्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु केले आहे. ९०च्या दशकात जशी ही मालिका प्रसिद्ध होती तशीच ती आता देखील प्रसिद्ध झाली आहे. या प्रसिद्धीमुळेच रामायण मालिकेमधील पात्रांबद्दल, मालिकेबद्दल अनेक छानशा, माहित नसलेल्या गोष्टी समोर येत आहेत. रामायणामधील प्रत्येक पात्र लोकांना पुन्हा आवडू लागले आहे. रामायण मालिका सध्या टीआरपी मध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

रामायण मालिकेमध्ये लक्ष्मणाचे पात्र सुनिल लहरी यांनी रंगवले होते. सर्वात मनोरंजक पात्र होतं ते म्हणजे लक्ष्मण. या मालिकेमध्ये लक्ष्मणाचा राग तसेच प्रेम लोकांनी पाहिले आहे. मोठ्या भावाप्रती प्रेम, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आणि एका क्षणात राग येणे ही लक्ष्मणाची ओळख होती. परंतु सुनील लहरी यांना राग हा खरोखरीच यायचा हे आपल्याला माहित नसेल. सुनील लहरी हे लोकांमध्ये लक्ष्मण म्हणूनच प्रसिद्ध आहेत. एका मुलाखतीदरम्यान सुनील लहरी यांनी सांगितले की, रामानंद सागर त्यांना मालिकेदरम्यान राग येईल असे वागत असतं, जेणेकरून लक्ष्मणाचा पात्रासाठी त्या रागाचा वापर होईल.कित्येकदा रामानंद सागर हे शूटिंगमध्ये इतके व्यस्त असतं की दुपारी जेवणासाठी कोणाला वेळ ही देत नसतं. याच गोष्टीचा सुनील लहरी यांना राग येतं असे आणि तो राग ते शूटिंग सुरु असताना काढत. रामायणाचा सेटवर रामानंदजी अशी मस्ती मस्करी करत असतं आणि यामुळेच ते सुनील लहरी म्हणजेच लक्ष्मणास आपला सहावा मुलगा मनात असतं. सुनील लहरी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची निवड शत्रुघ्न या पात्रासाठी झाली होती. लक्ष्मणाच्या पात्रासाठी शशि पुरी यांची निवड झाली होती. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामध्ये सुनील लहरी यांनी सांगितले की, का माहित नाही पण शशि पुरी यांनी हे पात्र करण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर हे पात्र निभावण्याची संधी सुनील लहरी यांना मिळाली.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.