सुनील शेट्टी म्हणजे एकेकाळी बॉलिवूडच्या टॉपच्या ऍक्शन अभिनेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव. सुनील शेट्टी म्हणजे जबरदस्त ऍक्शन हे जणू समीकरणच होतं. त्याच्या प्रत्येक चित्रपटात भरपूर ऍक्शन सीन्सची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळत असे. सुनील शेट्टीने त्याच्या जबरदस्त ऍक्शनच्या जोरावर आपला वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता. जबरदस्त ऍक्शन आणि भारदस्त आवाज हिच सुनील शेट्टीची ओळख होती. त्याच्या या दोन गोष्टींवर अनेक चाहते फिदा होते. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले मात्र इतर अभिनेत्यांप्रमाणे त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करता आली नाही. मात्र तरीही आपल्या ऍक्शनपॅक चित्रपटांच्या जोरावर तो चाहत्यांच्या मनात घर करण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रतीक्षेत अनेक फॅन्स असायचे.

एखाद्या तरुण नायकाला लाजवेल असा फिटनेस त्याने वयाच्या पन्नाशी नंतर सुद्धा जपला आहे. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यांमध्ये त्याचे सुद्धा नाव घेतले जाते. सुनीलने ‘बलवान’ या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने दिलवाले, मोहरा, गोपी किशन, रक्षक, बॉर्डर, हेरा फेरी, धडकन, फिर हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने 1992 साली आलेल्या ‘बलवान’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अभिनयच्या करियरची सुरुवात असल्याने सुनील शेट्टीला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटाच्या यश अपयशावर त्याचं अभिनय क्षेत्रातील करियर अवलंबून होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दिव्या भारती सुद्धा होती. राजू मावानी यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ऍक्शन- ड्रामा या प्रकारातील होता. सुनील शेट्टीने आजवर केवळ हिंदी भाषिकच नव्हे तर तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषेतील सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. यांपैकी काही सिनेमांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविल्यामुळे त्यांनी बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली.सुरुवातीच्या काळात सुनील शेट्टी सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये सहभागी होता. सुनील शेट्टीने आपल्या आजवरच्या करियरमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड बनवले आहेत. सुनील शेट्टीचा ‘मोहरा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमात सुनील शेट्टीसोबत अक्षय कुमार दिसला होता. या जोडीला प्रेक्षकांनी खूप मोठया प्रमाणात पसंती दर्शविली होती. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सुनील शेट्टीच्या अशा रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत, जो रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याला तोडता आला नाही.हि गोष्ट आहे 1991 सालची. या दरम्यान सुनील शेट्टी ‘बलवान’ या सिनेमाचे शूटिंग करत होता. या सिनेमाची शूटिंग सुरू होती, यावेळी सुनील शेट्टीकडे आपला चित्रपट साईन करून घेण्यासाठी निर्मात्यांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. सुनील शेट्टीने यावेळी तब्बल 35 चित्रपट साईन केले होते. हा खरोखर एक मोठा रेकॉर्ड मानावा लागेल. सुनील शेट्टीचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकलेला नाही. एखादा चित्रपट प्रदर्शित न होताही एखाद्या अभिनेत्याने तब्बल 35 चित्रपट साईन करण्याचा हा पहिला आणि आजवरचा एकमेव रेकॉर्ड म्हणावा लागेल.वाचकहो तर मग कसा वाटला सुनील शेट्टीचा हा अनोखा रेकॉर्ड. आज सुनील शेट्टी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय करताना फारसा दिसत नसला तरी त्याचा फार मोठा हॉटेलचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्याने प्रचंड यश संपादित केले आहे. सुनील शेट्टी एक अभिनेता असण्यासोबतच एक व्यवसायिक देखील आहे. त्याची अनेक हॉटेल्स आहेत. वर्षाला तो करोडो रुपये कमावतो.