सनी देओलसोबत सोनी महिवाल चित्रपटामध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री पूनम ढिल्लों उद्या आपला ५८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. पूनम ढिल्लोंचा जन्म १८ एप्रिल १९६२ रोजी कानपूर येथे झाला होता. पूनम ढिल्लोंने आपल्या फिल्मी करियरची सुरवात त्रिशूल या चित्रपटामधून सुरु केली होती. यानंतर ती बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.

१९८८ मध्ये पूनम ढिल्लोंने चित्रपट दिग्दर्शक अशोक ठाकरिया सोबत लग्न केले होते. पूनम ढिल्लों आणि अशोक ठाकरिया यांची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. अशोक ठाकरिया पहिल्या नजरेमध्ये पूनमच्या प्रेमामध्ये पडले होते. पूनम ढिल्लोंने एकदा सांगितले होते कि ते नेहमी मला फुल तेव्हापर्यंत पाठवत होते जेव्हापर्यंत मी लग्नाला होकार दिला नव्हता. अशोक ठाकरियासोबत लग्न केल्यानंतर पूनम बॉलीवूड पासून दूर गेली आणि तिने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले.लग्नानंतर पूनम आणि अशोक यांना दोन मुले झाली. त्यांच्या मुलाचे नाव अनमोल आणि मुलीचे नाव पालोमा आहे. लग्नानंतर काही वर्षातच पूनम आणि अशोक यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. त्यांच्यामधील तणाव वाढत गेला आणि शेवटी त्यांनी ९ वर्षानंतर १९९७ मध्ये घटस्फोट घेतला. पूनम ढिल्लों सध्या आपल्या मुलांसोबत राहते.पूनम ढिल्लोंने राजेश खन्नासोबत नुरी या चित्रपटामध्ये काम केले होते. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट झाला होता. चित्रपटामधील पूनम ढिल्लोंचा अभिनय दर्शकांना खूपच पसंत आला होता. आजसुद्धा पूनम ढिल्लोंला या चित्रपटामुळे आठवले जाते.

पूनम ढिल्लोंने ५ वर्षापर्यंत बॉलीवूडमधून ब्रेक घेतला आणि नंतर तिने जुदाई या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. पूनम ढिल्लों एक यशस्वी बिजनेसवुमन सुद्धा आहे, ती एक फेमस मेकअप कंपनीची मालकीण आहे.