बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनी लवकरच अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून चाहत्यांचा माहिती दिली आहे. तथापि अजून तिच्या चित्रपटाचे टायटल निश्चित झालेले नाही. या दरम्यान सनीने आपल्या फिल्मी करियरबद्दल बातचीत केली. एका मुलाखतीदरम्यान तिने खुलासा केला कि १० वर्षांमध्ये माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. तिने हे देखील सांगितले कि बॉलीवूडमध्ये तिचा प्रवास खूपच कठीण होता कारण कोणताही दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता.

बॉलीवूडमधील आपल्या प्रवासाबद्दल सांगताना सनी म्हणाली कि या १० वर्षांमध्ये माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. सनी म्हणाली कि मला इंडस्ट्रीवर खूप प्रेम आहे. मला जितके देखील काम मिळाले त्यामुळे मी खूपच खुश आहे. इथे अनेक चांगले वाईट निर्णय घेतले पण वाईट निर्णयांपासून मला बरेच काही शिकायला मिळाले. हे माझे घर आहे आणि मला इथे नेहमीच चांगले वाटते.

सनीने बॉलीवूडमधील आपल्या जुन्या दिवसांना आठवत सांगितले कि अनेक चित्रपट निर्माते तिच्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. ती म्हणते कि जेव्हा मी इथे आले होते तेव्हा लोक माझ्यासोबत काम करणे पसंद करत नव्हते. आज देखील प्रोडक्शन हाऊसमध्ये काही लोक असे आहेत जे मला काम देण्यास तयार नाहीत. पण मला काहीच अडचण नाही. कदाचित पुढे जाऊन मला त्यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी मिळेल.

सनी लिओनीने २०१२ मध्ये आलेल्या जिस्म २ चित्रपटामधून डेब्यू केला होता. पूजा भट्टच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटामध्ये सनीसोबत बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा देखील दिसला होता. चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. पण यामधील सनीच्या कामाला नोटीस केले गेले. यामुळे तिला नंतर बॅक टू बॅक चित्रपट मिळाले. यानंतर सनी जॅकपॉट, रागिनी एमएमएस २, एक पहली लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे, वन नाइट. स्टँड या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

एमएक्स प्लेयरची वेब सीरीज अनामिकामध्ये सनी शेवटची मुख्य भूमिका करताना दिसली होती. जी या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाली होती. तथापि सनी स्प्लिट्सविला टीव्ही शो होस्ट करण्यासाठी खूप चर्चेत आली होती. पण येणाऱ्या दिवसांमध्ये ती अर्जुन रामपाल-स्टारर द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव मधील एका गाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.