शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपट पाहिला नसेल असे कोणीही नाही. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि काजोलची जोडी दर्शकांना खूपच पसंत आली होती. हा चित्रपट आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला होता. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटामधील एक गाणे मेरे ख्वाबों में जो आए सुपरहिट झाले होते. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. आजही हे गाणे लोकांच्या ओठावर रेंगाळत असते.तसे तर खूपच कमी लोकांना माहिती आहे कि चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्राने या गाण्याला २४ वेळा लिहून घेतले होते आणि त्यानंतर हे गाणे फाईनल करण्यात आले होते. एका बातमीनुसार हे गाणे आनंद बक्षी कडून लिहून घेतले होते. जेव्हा ते गाणे पूर्ण लिहून आदित्य चोप्राकडे जात होते तेव्हा आदित्य चोप्रा काहीनाकाही चूक काढून ते गाणे रिजेक्ट करायचे.
आदित्य चोप्रा ते गाणे रिजेक्ट करण्यामागे एकच कारण असायचे ते म्हणजे आदित्य चोप्रा यांना गाण्याची पहिली लाईन पसंत पडत नव्हती. नंतर तब्बल २४ वेळा गाणे लिहून आनंद बक्षी आदित्य चोप्रा यांच्याकडे पोहोचले तेव्हा कुठे आदित्य चोप्रा यांना हे गाणे पसंत पडले. जेव्हा ह्या गाण्याचे शुटींग पूर्ण करून ते प्रदर्शित करण्यात आले तेव्हा ते दर्शकान खूपच पसंत पडले. हे गाणे त्यावेळी सुपरहिट झाले होते.
ह्या गाण्यामधून काजोलला त्यावेळी खूपच प्रसिद्धी मिळाली होती. हे गाणे काजोलच्या करियरसाठी खूपच फायदेशीर ठरले. गाण्यामध्ये काजोलने उत्कृष्ठ डांस केला होता आणि एक्सप्रेशन देखील खूपच चांगले दिले होते. काजोलचे हे गाणे आजदेखील लोकांना तितकेच आवडते.