अजूनही काही सेलिब्रिटीज सध्या कोरोना काळामध्ये आपल्या घरामध्ये राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान काही सेलिब्रिटी आपल्या फिटनेस, कुकिंग आणि सिंगिंग स्कीलवर विशेष लक्ष देत आहेत. तर फादर्स डेच्या निमित्ताने सेलिब्रिटीने आपल्या वडिलांसोबत काही संस्मरणीय फोटो शेयर केले आहेत. यामधीलच एक टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने आपल्या लहानपणाचा आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे जो खूपच व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये ती आपल्या वडिलांसोबत पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये पाहायला मिळत असलेली हि लहान मुलगी आज छोट्या पडद्यावरील एक दिग्गज स्टार आहे. फोटोमध्ये यलो आणि परपल कलरचा फ्रॉक घातलेली मुलगी आपल्या वडिलांच्या कुशीमध्ये हसताना पाहायला मिळत आहे. दोन वेण्यांच्या हेयर स्टाईलसोबत ती खूपच सुंदर दिसत आहे.

तुम्ही या फोटो मध्ये दिसत आलेल्या या लहान मुलीला ओळखले काय? जर नाही तर चला थोडी हिंट देतो. या अभिनेत्रीला शेवटचे एकता कपूरच्या टीव्ही शो नागिनमध्ये मुख्य भुमिकेमध्ये पाहिले गेले होते. त्याचबरोबर हि आपल्या फॅन फॉलोईंग आणि सक्सेसच्या बाबतीत खूपच कमी काळामध्ये खूपच पुढे निघून गेली.या टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव :- तुम्ही ओळखले काय? जर अजून देखील नाही तर तुमच्या मदतीसाठी सांगतो कि हि एक दिग्गज टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आहे. या फोटोमध्ये ती आपल्या वडिलांसोबत पाहायला मिळत आहे. लहानपणापासून आतापर्यंत सुरभी ज्योगी खूपच बदलली आहे. आज सुरभी टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिचे टीव्ही शो सुपर-डुपर हिट राहिले आहेत.पंजाबी चित्रपटांमधून केली होती सुरवात :- सुरभी ज्योतीने २०१० मध्ये पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधून डेब्यू केला होता. आतापर्यंत सुरभीने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर सुरभी कुबूल है, कोई लौट के आया है, देव, इश्कबाज, नागिन-३, ये जादू है जिन्न का यासारख्या शो मध्ये पाहायला मिळाली आहे.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.