बॉलीवूड आणि टीव्ही जगतामध्ये आपली ओळख बनवणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी नुकतेच अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर एफआईआर दाखल करून या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत. सुशांतच्या वडिलांनी रियावर अन्य आरोपांव्यतिरिक्त पैसे हडपल्याचा देखील आरोप केला आहे. सुशांतच्या वडिलांचा दावा आहे कि सुशांतच्या अकाऊंटमध्ये १७ करोड रुपये होते.पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये त्यांनी सांगितले कि आपल्या मुलाच्या एका बँक खात्याच्या स्टेटमेंट मधून मला माहित झाले आहे कि गेल्या एक वर्षामध्ये जवळ जवळ १५ करोड रुपये काढले होते. ज्या जागी पैसे ट्रांसफर झाले त्यांचा माझ्या मुलाशी काहीच संबंध नव्हता. माझ्या मुलाच्या सर्व खात्यांची चौकशी केली जावी कि या बँक खात्यामधून आणि क्रेडीट कार्डवरुन किती पैसा रियाने आपल्या कुटुंब आणि सहकार्यांिसोबत मिळून फसवणूक आणि षड्यंत्र करून हडपला आहे.पैसे अश्या खात्यामध्ये ट्रांसफर झाले ज्यांचा सुशांतशी काहीच संबंध नाही. सर्व खात्यांची चौकशी करावी. तर आता रिपब्लिक वर्ल्डच्या अहवालानुसार सुशांतच्या अकाऊंटमधून फ्लाइट तिकीट, हॉटेलचा खर्च, ट्यूशन फीस, शॉपिंग सारखे अनेक खर्च देखील रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक वर केले गेले आहेत. हे बँक रेकॉर्ड समोर आल्यानंतर गेल्या वर्षामध्ये झालेल्या देवाण-घेवाण आणि सुशांतच्या लाईफमध्ये रियाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होतात.
या रिपोर्टनुसार नोवेंबर २०१९ मध्ये ४ करोड, ६२ लाख पेक्षा अधिक बॅलेंस पासून फेब्रुवारी २०२० मध्ये सुशांतचा बँक बॅलेंस कमी होऊन फक्त १ करोड इतकाच राहिला होता. शौविक चक्रवर्तीच्या ८१००० रुपयेच्या फ्लाइट तिकीटपासून १ लाख पेक्षा अधिक पर्यंत रियाचा मेकअप, शॉपिंग, पार्लरचा खर्च आणि इतर अनेक प्रकारचा खर्च आहे. बिहार पोलीस सध्या सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. ते सुशांतच्या बँक अकाऊंटचे डिटेल्स मागत आहेत. सूत्रांनुसार इडीने मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलची चौकशी करण्यासाठी सुशांतच्या कुटुंबियांकडून रिया आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरची परत मागवली आहे.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.