१० तास कसून चौकशी नंतर पोलिसांसमोर रिया चक्रवर्तीने केला मोठा खुलासा, केसमध्ये नवीन वळण मिळण्याची शक्यता !

3 Min Read

सुशांत सिंह राजपूत भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख चेहऱ्यापैकी एक होते. सुशांत राजपूत हे चांगले अभिनेता तर होतेच सोबतच ते एक उत्कृष्ट डान्सर होते. बॉलीवूड अभिनेता सुशांत राजपूने १४ जूनला मुंबईच्या बांद्रा स्थित आपल्या फ्लॅटमध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. त्याच्या अचानक मृत्युमुळे सर्वजण हैराण आहेत. अजूनसुद्धा लोकांना विश्वास करणे अवघड जात आहे कि सुशांत आता या जगामध्ये नाही. सुशांतच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेता सुशांतने ३४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. कोणी याला डिप्रेशनशी जोडत आहे तर कोणी याला बॉलीवूडमधील नेपोटिज्मचे कारण मानत आहे. तर मुंबई पोलीस याचा छडा लावत आहेत. या प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा समोर आला आहे.सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणामध्ये त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत गुरुवारी पोलिसांनी १० तास चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान रियाने सुशांतसंबंधीत अनेक खुलासे केले आहेत. तर लग्न करण्याची गोष्ट देखील मान्य केली आहे. एका न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार रियाने सुशांतसोबत आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे कि दोघे लॉकडाउनमध्ये एकत्र राहिले होते. तथापि दोघांमध्ये भांडण झाले आणि या कारणामुळे तिने अपार्टमेंट सोडले होते. याशिवाय त्यांनी लवकरच लग्न करण्याची गोष्ट देखील स्वीकारली आहे.रिया चक्रवर्तीने पोलिसांना सुशांतच्या डिप्रेशनचा पुरावा देखील दिला आहे. रियाने सांगितले कि सुशांतने औषधे घेण्यास नकार दिला होता. तो योगा आणि मेडिटेशनद्वारे यातून बाहेर निघत होता.

या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार होता :- रियाने पोलिसांना हे देखील सांगितले कि दोघे लवकरच एका चित्रपटामध्ये पाहायला मिळणार होते. हा चित्रपट रुमी जाफरी बनवणार होते. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे चित्रपट काही काळ टाळण्यात आला होता. रियाने सांगितले कि सुशांतजवळ कशाचीही कमी नव्हती, त्याच्या हातामध्ये अनेक प्रोजेक्ट्स होते. त्याचे अनेक प्रोजेक्ट्सवर साईन करण्याची देखील चर्चा चालू होती. तिने या सर्व प्रोजेक्ट्सच्या डीटेल्स देखील पोलिसांच्या समोर ठेवल्या आहेत.सुशांतने सुरु केल्या होत्या तीन कंपन्या :- रियाने हे देखील सांगितले कि सुशांतने तीन कंपन्या सुरु केल्या होता. यामधील एका कंपनीची ती डायरेक्टर देखील होती. पहिली कंपनी त्याने मे २०१८ मध्ये सुरु केली होती. हि कंपनी आर्टिफिशियल इंटेलीजेंस, वर्चुअल रिएलिटीवर काम करत होती.सुशांतने दुसरी कंपनी विव्हिडरेज रियालॅटीक्स सप्टेंबर २०१९ मध्ये सुरु केली होती. हि कंपनीसुद्धा आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि टेक्निकवर काम करत होती. रिया या कंपनीच्या बोर्डची सदस्य होती. तर तिसरी कंपनी फ्रंट इंडिया फॉर वर्ल्ड फाउंडेशन नावाची होती जी एनजीओ आहे. हि गरिबी कुपोषणसारख्या समस्यांवर काम करते. याची सुरवात याच वर्षी झाली होती.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *