बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत अकालीच या जगातून निघून गेला, पण बॉलीवूडमधील त्याचे मित्र त्याचे चाहते त्याला विसरायला तयार नाहीत. सुशांत सिंह राजपूतचे सर्वात चर्चित चित्रपट एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी आणि छिछोरे आहेत. छिछोरेचे डायरेक्शन नितेश तिवारीने केले होते. सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा अजून प्रदर्शित झालेला नाही, पण प्रदर्शनासाठी जवळ जवळ तयार आहे. या चित्रपटामधील त्याची को-स्टार संजना सांघीने इंस्टाग्रामवर एक इमोशनल पोस्ट शेयर करून त्याची आठवण केली आहे.हॉलीवुडच्या चर्चित चित्रपटाचा रिमेक आहे हा चित्रपट :- सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघीचा चित्रपट दिल बेचारा नॉवेल आणि हॉलीवुडचा चर्चित चित्रपट फॉल्ट इन अवर स्टार्सचा रिमेक आहे. संजनाने इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि जो कोणी म्हणतो काळानुसार प्रत्येक जखम भरून येते, खोटे बोलतात ते. आयुष्यातील काही जखमा अशा असतात कि ज्या नेहमी ताज्या राहतात आणि त्या सारख्या दुख देतात. आता फक्त या क्षणांच्या आठवणी सोबत राहणार. आम्ही एकत्र प्रमाणे बोललो, हसलो आणि आता असे कधीच होणार नाही. अनेक प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत ते सर्व प्रश्नच बनून राहतील.सांघीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे कि, या जखमांमध्ये एक चित्रपट देखील आहे जो सर्वांसाठी एक गिफ्ट सारखा आहे. या जखमांमध्ये देशातील मुलांसाठी स्वप्ने, योजना आणि इच्छा आहेत. देशातील मुलांचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य पूर्ण व्हायला हवे. या जखमांमध्ये प्रत्येक कलाकारासाठी एक अविरत सर्जनशील उत्साह आहे.
या जखमांमध्ये जगातील एक अशी अशा होती जी सर्व टॉक्सिसिटीतून मुक्ति देऊन इमानदारी, अखंडता, दया आणि व्यक्तित्व बनवून ठेवण्यासाठी वचन देते. मी या सर्व अशांना एकटेच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तर तू वचन दिले होते कि आपण सर्व हे एकत्र करू. सुशांतचा आगामी चित्रपट दिल बेचारा पहिला असा चित्रपट असेल जो त्याच्याशिवाय प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जवळ जवळ तयार आहे. त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे कि हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करता मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.