अभिनेता सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस प्रत्येक पैलूचा कसून तपास करत आहेत, याबद्दल आतापर्यंत कुटुंब, डॉक्टर, जवळचे मित्र आणि बॉलीवूड सेलेब्स सहित अनेक लोकांची चौकशी झाली आहे. तर आता पोलिसांनी या प्रकरणामध्ये फिल्ममेकर महेश भट्टची देखील चौकशी केली आहे. पोलिसांनी जवळ जवळ अडीच तास महेश भट्टची चौकशी केली. माहितीनुसार महेश भट्ट सकाळी ११.३० वाजता पोलीस स्टेशन पोहोचले आणि दुपारी दोन वाजता बाहेर पडले. पोलिसांच्या सूत्रानुसार या दरम्यान महेश भट्टला सुशांत सिंह राजपूतच्या करियरबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले.सुशांत सिंह राजपूत सु*सा*ई*ड केस मध्ये चौकशीसाठी पोलिसांनी महेश भट्टला समन्स पाठवले होते, ज्यानंतर ते आज आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन पोहोचले होते. माहितीनुसार डीसीपीने स्वतः महेश भट्टची चौकशी केली. यानंतर महेश भट्टला सांताक्रुज पुलिस स्टेशनमधून बाहेर पडताना स्पॉट देखील केले गेले.
याआधी रविवारी महाराष्ट्रच्या गृहमंत्र्यांनी माहिती दिली होती कि महेश भट्टला चौकशीसाठी बोलावले जाईल. त्यांनी सांगितले कि आतापर्यंत ३७ लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले गेले आहे. एक-दोन दिवसांमध्ये महेश भट्टचे देखील स्टेटमेंट रेकॉर्ड केले जाईल. कंगना रनौतचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी तिला समन्स पाठवले आहे. करण जौहरच्या मॅनेजरलाही कॉल केला गेला आहे. जर आवश्यकता भासल्यास जौहरला देखील कॉल केला जाईल.
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राईटर, अभिनेता आणि डायरेक्टर रुमी जाफरीला देखील चौकशीसाठी बोलावले होते. सूत्रांच्या माहितीनुसार रुमी जाफरी बांद्रा पोलीस स्टेशन पोहोचले होते, जिथे त्यांनी आपला जबाब नोंदवला. या दरम्यान पोलिसांनी त्यांना सुशांतच्या डिप्रेशन, रियासोबत त्याचे रिलेशन आणि तो जो सुशांतसोबत चित्रपट बनवणार होते त्याबद्दल प्रश्न विचारले.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.