बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. १४ जूनला सुशांत सिंह राजपूत आपल्या मुंबई येथील फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणाला बॉलीवूडमधील नेपोटिज्म ला जबाबदार ठरवण्यात येत आहे. तर हे सु*सा*इ*ड आहे का षडयंत्र आहे हे जाणून घेण्यासाठी सुशांतच्या कुटुंबापासून बॉलीवूड पर्यंत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे. त्याचे वडील देखील सुरुवातीपासून या प्रकरणाची सीबीआइ चौकशीची मागणी करत आहेत.या सर्वांमध्ये सुशांतचे वडील के के सिंह यांच्या नावाने एक फेक ट्वीट जबरदस्त व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये दावा केला गेला आहे कि सुशांतचा आत्मा रडत आहे आणि सीबीआई चौकशीची मागणी करत आहे. सुशांतच्या चाहत्यांनी याबद्दल बिहारमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी करण जौहर, सलमान खान व एकता कपूर सहित अनेकांवर दावा दाखल केला आहे. सुशांतचे वडील देखील मुलाच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत.सुशांतचे वडील के के सिंहच्या नावाने एक फेक ट्विटर हँडलवरून ३ जुलै आणि ४ जुलैला चार ट्विट केले गेले आहेत. ३ जुलैच्या संध्याकाळी ६.१६ वाजता केल्या गेलेल्या पहिल्या फेक ट्विटमध्ये लिहिले आहे कि सलमान खानचा आगामी चित्रपट कभी ईद कभी दिवाली येत आहे, तुम्ही यावर बहिष्कार घालणार का? होय/नाही? यानंतर रात्री १०.२७ वाजता दुसरे फेक ट्विट केले गेले ज्यामध्ये लिहिले आहे करण जौहर गँग (आलिया भट्ट, सोनम कपूर, अनन्या, सोनाक्षी आणि अनेक नेपोटिज्मग) च्या विरुद्ध पूर्ण देशामध्ये एक मोहीम छेडणार आहोत, तुम्ही माझ्या सोबत आहात का? हो/नाही.यानंतर या फेक ट्विटर हँडलवरून ४ जुलैला सकाळी १०.१६ वाजता एक ट्विट झाले यामध्ये लिहिले होते, आज माझ्या सुशांतची आत्मा रडत आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. यानंतर ४ जुलैला रात्री ९.३० वाजता याच फेक ट्विटर हँडलवरून चौथे ट्वीट झाले. यामध्ये दावा केला आहे कि आता मी लवकरच सुशांतच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. उद्या जर मला काही झाले तर किती लोक माझ्यासोबत आहेत. री ट्विट करून समर्थन करा.तुम्हाला जाणून हैराणी होईल कि या फेक ट्विटर अकाउंटवरून झालेल्या ट्वीटला हजारो लोकांनी लाईक, शेयर आणि रीट्वीट केले आहे. सुशांतच्या वडिलांचा नावाने बनवलेल्या या फेक ट्विटर अकाउंटचे १० हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स बनले आहेत तर हे अकाऊंट २४ जूनला बनवले गेले होते. ट्विटर तर्फे या अकाऊंटला व्हेरीफाई करून ब्लू टिक मार्क देखील अजून मिळालेला नाही. असे असून देखील हे फेक ट्वीट सोशल मिडियावर खरे सांगून व्हायरल केले जात आहेत. सुशांतच्या वडिलांच्या नावाने व्हायरल होत असलेले हे ट्वीट त्यांचे नाहीत. वास्तविक सुशांतच्या वडिलांचे ट्विटरवर कोणतेही अकाऊंट नाही.