सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीनंतर आता या व्यक्तीची पोलिसांकडून कसून चौकशी, नोंदवला जवाब !

2 Min Read

सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणामध्ये पोलीस चौकशीमध्ये व्यस्त आहेत. दररोज कोणत्याना कोणत्या व्यक्तीसोबत सुशांतबद्दल चौकशी सुरु आहे. गेल्या दिवसांमध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत केली गेलेली पोलीस चौकशी खूपच चर्चेमध्ये राहिली. या चौकशीनंतर मिडिया रिपोर्ट्समध्ये रिया द्वारे अनेक खुलास्यांबाबत दावे देखील केले गेले. पोलीस या केसमध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही बाबींवर कसून चौकशी करत आहे. तर आता असे सांगितले जात आहे कि सुशांतचा एक क्लोज फ्रेंड आणि रूम मेट राहिलेला सिद्धार्थ पिठानीची देखील चौकशी झाली आहे.गेल्या दिवसांमध्ये सुशांतच्या मृत्युवर शोक व्यक्त करताना सिद्धार्थ पिठानीची सोशल मिडिया पोस्ट खूपच चर्चेमध्ये राहिली होती. तर आता स्पॉटबॉयच्या एका रिपोर्टनुसार सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला नुकतेच बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये स्पॉट केले गेले. सिद्धार्थ ब्लॅक टी-शर्ट घातलेला आणि चेहऱ्यावर मास्क लावलेला बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. असे म्हंटले जात आहे कि सिद्धार्थ आणि सुशांत मुंबईच्या बांद्रामध्ये एकाचा अपार्टमेंटमध्ये राहिले आहेत.
याआधी रिया चक्रवर्ती सोबत पोलिसांनी चौकशी केली होती. ती आपल्या वडिलांसोबत स्पॉट झाली होती. रियासोबत पोलिसांनी जवळ जवळ १० तास सुशांतच्या लाईफच्या अनेक बाबींविषयी चौकशी केली. अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार तिच्या द्वारे सुशांतच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक खुलासे केले गेले.
सुशांतच्या प्रकरणावर तीन तीन स्पेशल टीम्स बनवल्या गेल्या आहेत. तर या दोन लोकांसोबत पोलिसांची या टीम्समधील एक टीम चौकशी करेल. सुशांत केसमध्ये एक टीम त्याच्या बिजनेस कॉन्टैक्ट पासून ते वैयक्तिक नात्यांपर्यंत प्रत्येक बाबींवर तपासणी करत आहे. पोलिसांची तिसरी टीम सुशांतचे डॉक्टर, मित्र, फॅमिली मेंबर्स सोबत चौकशीमध्ये गुंतली आहे. अशीच जवळ जवळ १०-११ लोकांसोबत चौकशी केली जात आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *