टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी मुंबई येथील आपल्या घरामध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री सहित पूर्ण देशामध्ये शोकाकुल लाट पसरली आहे. यादरम्यान अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल अनेकजण वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत आणि अभिनेत्याच्या या घटनेमागील कारण जाणू इच्छित आहेत. यादरम्यान सोशल मिडियावर काही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसवर देखील प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तर अभिनेत्याच्या मॅनेजर आणि क्रिएटिव मॅनेजरच्या विधानानुसार अभिनेता गेल्या ६ महिन्यापासून उदासीनते झगडत होता. यादरम्यान अभिनेत्याला प्रत्येक घरा-घरामध्ये ओळख देणारा सुपरहिट शो पवित्र रिश्तामधील अनेक कलाकारांनी देखील त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.पवित्र रिश्तामध्ये सुशांत सिंह राजपूतची भूमिका मानवच्या आईची भूमिका साकारणारी सविता ताई म्हणजेच उषा नाडकर्णी देखील सुशांतच्या मृत्यूच्या बातमीवर दुखी आहे. सुशांतबद्दल बोलताना उषा नाडकर्णी म्हणतात कि, तो खूपच शांत स्वभावाचा होता. आम्ही पवित्र रिश्तामध्ये जवळ जवळ दीड वर्षे काम केले आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. मला माझ्या हेयर ड्रेसरने सुशांतच्या मृत्यूबद्दल सांगितले, तेव्हा मला विश्वास बसला नाही. मला वाटले कि हि एक अफवा आहे. यावेळी विश्वास बसत नव्हता कि तो आ*त्म*ह*त्या कसा काय करू शकतो.
त्या पुढे म्हणाल्या कि, प्रत्येक ठिकाणी हि बातमी दाखवली जात होती. दुखाची गोष्ट हि आहे कि हि बातमी खरी निघाली. सुशांतची आ*त्म*ह*त्ये*ची बातमी पाहताच माझे शरीर थरथर कापू लागले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि काही वेळ मी आश्चर्यचकित झाले. देव त्याच्या आ*त्म्या*ला शांती देओ.सुशांतने शो सोडल्यानंतर मी त्याच्या संपर्कात नव्हते. जेव्हा त्याने फिल्मी जगतामध्ये पाऊल ठेवले, त्याला सफलता मिळाली. त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि नंतर त्याला संपर्क करून त्याला त्रास देणे मला योग्य वाटले नाही. आता फक्त हाच विचार येतो कि त्याच्याजवळ सर्व काही होते, मग त्याने असे का केले. तो फक्त स्वतःच्या कामाशी काम ठेवत होता. तो नेहमीच माझ्या आठवणीत राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.