बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयने ६ जुलैला जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या या एफआयआरमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती सहित सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांची नावे सामील आहेत. एफआयआर दाखल केल्यापासून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांची ईडीने देखील चौकशी सुरु केली आहे. या चौकशीमध्ये श्रुतीने रिया आणि सुशांतसंबंधित अनेक मोठे खुलासे केले आहेत.रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचे माजी मॅनेजर असलेली श्रुती मोदीने रियाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली आहे. श्रुती म्हणाली कि रियाच सुशांततर्फे सर्व आर्थिक व्यवहार आणि त्याचे प्रोफेशनल संबंधित सर्व निर्णय घेत होती. सुशांत आणि रिया ज्यावेळी एकमेकांना डेट करू लागले त्यानंतर काही महिन्यांमध्येच माझी त्यांच्यासोबत कामामुळे ओळख झाली होती. मला त्यांच्या आर्थिक गैरव्यवहार किंवा दुसऱ्या इतर व्यवहाराविषयी काहीच माहिती नाहीय. पण रिया सुशांततर्फे सर्व महत्वाचे निर्णय घेत होती. यामध्ये आर्थिक निर्णयापासून ते प्रोफेशनल निर्णयापर्यंत सर्व बाबी सामील आहेत.
सुशांतच्या कंपनीमध्ये काम करत असलेली श्रुती हि रिया आणि तिचा भाऊ शौविकचे देखील सर्व काम पाहत होती. दरम्यान श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान तिने सुशांत सोबत काम केले होते. सुशांतचे वडील केके सिंह यांनी ज्यावेळी पटना येथील पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल केली होती तेव्हा त्यांनी श्रुती मोदीचे देखील नाव घेतले होते. त्यामुळे रिया आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती श्रुतीला माहित असल्यामुळे ईडीने तिची देखील चौकशी केली आहे.
दरम्यान ईडीने सुशांतच्या चार बँक खात्यांचे सर्व डीटेल्स बारकाईने तपासले आहेत. त्याचबरोबर सुशांतने कुटुंबियांचा नावे केलेल्या ठेवींची देखील तपासणी केली आहे. सुशांतने सुरु केलेल्या तिन्ही कंपन्यांचे सर्व डीटेल्स, निर्मिती, त्यातील गुंतवणूक यातील बाबी देखील तपासल्या आहेत. ८ ऑगस्ट रोजी ईडीने रिया आणि तिचा भाऊ शौविकची तब्बल १० तास चौकशी केली होती. शौविक आणि सुशांत यांनी एकत्र दोन कंपन्या चालू केल्या होत्या आणि या कंपन्यांमध्ये दोघेही संचालकपदी होते.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.