बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या राहत्या घरी ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. त्याच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेता सुशांतने ३४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. कोणी याला डिप्रेशनशी जोडत आहे तर कोणी याला बॉलीवूडमधील नेपोटिज्मचे कारण मानत आहे. तर मुंबई पोलीस याचा छडा लावत आहेत. या प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा समोर आला आहे. अभिनेता सुशांतने मृत्युच्या तीन दिवसांअगोदर घरामधील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले होते. विशेष म्हणजे पगार देताना त्याने सर्व स्टाफला हेदेखील सांगितले होते कि आता यापुढे पगार देणे शक्य होणार नाही.सुशांत सिंग राजपूतच्या या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ जणांची चौकशी करण्यात आली आहे. एका वेबसिरीजसाठी सुशांत दिशा सालियनसोबत देखील संपर्कात होता अशी देखील माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे. दिशा अगोदर सुशांतसाठी मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*पूर्वी काही दिवसांअगोदर तिने देखील आ*त्म*ह*त्या केली होती. परंतु दोघांच्या चर्चेबद्दल अद्याप काही जास्त माहिती मिळाली नाही.
सुशांतच्या वर्कफ्रंटबदल बोलायचे झाले तर त्याने आपल्या करियरची सुरवात २०१३ मध्ये काई पो चे या चित्रपटामधून केली होती. याच वर्षी तो शुद्ध देसी रोमांसमध्ये देखील पाहायला मिळाला होता. २०१४ मध्ये आमिर खानच्या पीके चित्रपटामध्ये अनुष्काच्या लवरच्या भूमिकेमध्ये तो पाहायला मिळाला होता. २०१५ मध्ये त्याचा डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
सुशांत सिंह राजपूतला सर्वात जास्त लोकप्रियता २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या जीवनावर आधारित एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटामधून मिळाली. यानंतर त्याने, वेलकम टु न्यूयॉर्क, केदारनाथ, सोनचिड़िया आणि छिछोरे सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.