बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे नुकतेच मुंबई येथी बांद्रा स्थित त्याच्या घरी नि*ध*न झाले आहे. त्याने ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. त्याने हे पाऊल का उचलले याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. पण त्याच्या आ*त्म*ह*त्येच्या बातमीने संपूर्ण बॉलीवूड हैराण आहे. सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी बिहारच्या मल्डीहा या छोट्याश्या गावामध्ये झाला होता, जे पुर्णिया जिल्ह्यामध्ये आहे. इतक्या छोट्या गावापासून बॉलीवूडपर्यंतचा प्रवास करणे काही सोपे काम नव्हते. पण त्याने कठोर मेहनत आणि काही करण्याच्या जिद्दीने समोरचे सर्व अडथळे पार केले.सुशांत सिंह राजपूतचे वडील के. के. सिंह रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत. सुशांतच्या आईचे २००२ मध्ये नि*ध*न झाले होते. सुशांत आपल्या कुटुंबामध्ये सर्वात लहान होता. रिपोर्ट्सनुसार त्याला चार बहिणी आहेत, ज्यामधील एका बहिणीचे नि*ध*न झाले आहे. तर सुशांतची एक बहिण मीतू स्टेट लेवल क्रिकेटर राहिली आहे. सुशांत आपल्या आईच्या आठवणीत सोशल मिडिया नेहमी आपल्या भावना व्यक्त करत होता.
नुकतेच त्यांच्या आठवणीत त्याने एक फोटो शेयर केला होता. विशेष म्हणजे सुशांतची शेवटही पोस्ट त्याच्या आईबद्दल होती. सुशांत सिंह राजपूतने प्राथमिक शिक्षण पटनाच्या सेंट करेन्स हाई स्कूल आणि दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडल येथून घेतले. त्यानंतर त्याने दिल्ली टेक्निकल यूनिवर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले, तथापि त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले नाही आणि मध्येच सोडले.
टेलिव्हिजनच्या जगतामध्ये त्याने २००८ मध्ये किस देश में है मेरा दिल मधून पदार्पण केले. नंतर त्याला पवित्र रिश्तामध्ये मुख्य भूमिका ऑफर झाली आणि तो छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांमध्ये गणला जाऊ लागला. सुशांतचे फिल्मी करियर काई पो चे मधून सुरु झाले. पहिलाच चित्रपट सफल राहिला आणि त्याच्या अभिनयाचेदेखील कौतुक झाले. तथापि गेल्या वर्षी आलेला छिछोरे हा त्याचा शेवटचा चित्रपट राहिला जो बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.