सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. त्याचबरोबर सुशांतचे जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मिडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यामध्ये सुशांत पूजा करताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. या पूजेमध्ये रिया चक्रवर्ती उपस्थित नव्हती अशी देखील माहिती पुजाऱ्याने दिली आहे.सुशांत सिंह राजपूतने बांद्रा येथील केपरी हाइट्स येथील १५ व्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटमध्ये रुद्राभिषेकची पूजा केली होती. याच पूजेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये रिया चक्रवर्ती दिसत नाही आहे. पंडित गोविंद नारायण शास्त्री यांनी सांगितले कि या पूजेमध्ये सुशांत सिंह राजपूत, त्यांची बहिण मीतू सिंह, बहिणीचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्य आणि सुशांतचा स्टाफ देखील उपस्थित होता. पण रिया या पूजेमध्ये उपस्थित नव्हती. हि पूजा तब्बल ४ तास करण्यात आली होती.पूजेदरम्यान सुशांत डिप्रेशनमध्ये आहे असे जरादेखील दिसून येत नाही. सुशांतने आ*त्म*ह*त्या केल्याची बातमी ऐकताच आपल्याला धक्का बसला असे देखील शास्त्री यांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयने द्वारे करण्यात यावा अशी देखील त्यांनी मागणी केली. शास्त्री म्हणाले कि या पूजेनंतर सुशांत आणि माझ्यामध्ये कोणताही संपर्क झाला नाही. हि पूजा घरामध्ये शांती, वैभव आणि धन लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते.सुशांत आणि त्याच्या वडिलाचं पटत नव्हतं : संजय राऊत :- सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणामुळे सध्या राज्य सरकारवर चांगलाचा निशाना साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रामधून आपली भूमिका मांडली आहे. सुशांतचे कुटुंब आणि त्याचे वडील पाटण्यामध्ये राहत होते. त्याच्या वडिलांसोबत त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे सुशांत नाराज होता. त्यामुळे सुशांत आणि त्याच्या वडिलांदरम्यान भावनिक नाते संपुष्टात आले होते, असे राऊत म्हणाले.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.