अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. पोलिसांची याप्रकरणात अजून चौकशी सुरूच आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रोज एक नवीन प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे असे घोषित केले आहे. आता फक्त व्हिसरा रिपोर्टची सर्वजण वाट पाहत आहेत. आता या प्रकरणामध्ये आणखीण काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिग्दर्शक संजय लीला भंसाळीच्या चौकशी दरम्यान अनेक खुलासे समोर आले होते. याप्रकरणात घटनास्थळी एक लाल बॅग आढळून आली होती, ज्याचा खुलासा आता समोर आला आहे.सुशांतचा ज्या रूममध्ये मृत्यू झाला त्याठिकाणी मिळालेली लाल बॅग चर्चेचा विषय ठरली होती. याला कारणहि तसेच आहे सुशांतचा जवळचा मित्र असलेला महेश शेट्टीजवळ देखील अशीच लाल बॅग पाहायला मिळाली होती. एका फोटोमध्ये महेशकडे असली लाल बॅग दिसली होती. ज्यानंतर त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. एका न्यूज वेबसाईटनुसार पोलिसांनी आता सत्य उघड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या मृत्युच्या ठिकाणी आढळून आलेली लाल बॅग त्याची बहिण मीतूची होती. ज्यावेळी ती सुशांतला पाहण्यासाठी आली होती तेव्हा ती हीच बॅग घेऊन आली होती.याशिवाय दिग्दर्शक संजय लीला भंसाळीने फक्त सुशांत सिंह राजपूतलाचा चित्रपट ऑफर केले नव्हते तर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिताला देखील त्याने चित्रपटातील गाण्यासाठी ऑफर दिली होती. माहितीनुसार एका लावणीसाठी संजय लीला भंसाळीने अंकिताला ऑफर दिली होती जी अंकिताने नाकारली होती. नंतर संजय लीला भंसाळीने हि लावनी चित्रपटामधून काढून टाकली. तत्पूर्वी संजय लीला भंसाळीने पोलीस चौकशीदरम्यान सुशांतला ३ चित्रपट ऑफर केल्याचे सांगितले होते, पण यश राज फिल्मच्या करारामुळे तो हे करू शकला नाही.भंसाळीने म्हंटले कि २०१६ नंतर सुशांत सिंह राजपूतला मी फक्त तीन वेळा चित्रपट शोमध्ये भेटलो पण यादरम्यान माझी त्याच्यासोबत चित्रपट करण्यासंदर्भात कोणतीही बातचीत झाली नाही असे सांगितले. यश राज बॅनरखाली बनत असलेल्या पानी चित्रपटाचे निर्देशन शेखर कपूर करत होते, ज्यामध्ये सुशांत सिंह पाहायला मिळणार होता. पण काही कारणामुळे हा चित्रपट बंद झाला. सुशांतच्या मृत्यूनंतर शेखर कपूरने आपल्या ट्वीटमध्ये खुलासा केला होता कि सुशांत गेल्या काही महिन्यांपासून खूपच अस्वस्थ होता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.