“सुसाइड ऑर मर्डर” सुशांत सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेल्या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आदित्य ठाकरे !

3 Min Read

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये सध्या सीबीआयद्वारे तपास सुरु आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ड्रग्ज कनेक्शनदेखील उघडकीस आले आहे आणि त्याबद्दल एनसीबीकडूनही देखील तपास केला जात आहे. इतकेच नाही तर या प्रकरणामध्ये सध्या राजकिय संबंध असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्ये सध्या वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांचा संध्या असल्याचे बोलले जाते आहे. याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आपले स्पष्टीकरण देखील दिले आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे कि आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.सुशांत सिंह राजपूतच्या अशा रहस्यमय मृत्यूवर एक चित्रपट देखील येणार आहे ज्याचे नाव ‘सुसाइड ऑर मर्डर’ असे आहे. या चित्रपटाची घोषणा सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर लगेच करण्यात आली होती. आता या चित्रपटामध्ये आदित्य ठाकरे यांच्याशी मिळती-जुळती भूमिका पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.चित्रपटातील पात्रांना नाहीत खरी नावे :- एका न्यूज वेबसाईटशी बोलताना निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी याबद्दल खुलासा केला आहे. यादरम्यान बोलताना ते म्हणाले कि चित्रपटाच्या स्टोरीनुसार आम्ही कलाकारांचा शोध घेत आहोत. विजय शेखर गुप्त पुढे म्हणाले कि या चित्रपटामध्ये कोणत्याही भूमिकेला खरे नाव नसल आणि राजकिय भूमिकांची नावे देखील खरी नसतील. त्याचबरोबर ते हे देखील म्हणाले कि मी कधीच म्हणणार नाही कि हि भूमिका आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित आहे.विजय शेखर गुप्ता यांनी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हि माहिती दिली कि सुसाइड आणि मर्डर या चित्रपटाचे शुटींग ३० सप्टेंबर पासून सुरु करण्यात येईल. याचा शुभारंभ नोएडातील हॉटेल ब्लू रेडिसानमध्ये करण्याचे योजले आहे. चित्रपटाचे पहिले शेड्युल ४० दिवसांचे करण्यात आले आहे यामध्ये ग्रेटर नोएडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये शुटींग करण्यात येईल.१४ जूनला सुशांत त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूच्या चार दिवसांनंतरच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. इतकेच नाही तर अल्पावधीतच या चित्रपटामधील सर्व भूमिका निश्चित केल्या गेल्या होत्या. या चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतची भूमिका सचिन तिवारी, रिया चक्रवर्तीची भूमिका श्वेता पराशर, करण जोहरची भूमिका राणा साकारणार आहेत.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *