दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत. जस जसा तपास पुढे जात आहेत तस तसा या प्रकरणामध्ये गुंतागुंत आणखीनच वाढत आहे. यादरम्यान आता सुशांतच्या मित्राने एक मोठा सणसणीत खुलासा केला आहे.सुशांत सिंह राजपूतचा मित्र गणेश हिवारकर याने एक मोठा गौप्यस्फोट करून सर्वांनाच हैराण केले आहे. गणेश हिवारकर याने दावा केला आहे कि, सुशांतची जुनी मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबत मोठी माहिती मला माहित आहे. त्याचबरोबर त्याने हे देखील म्हंटले आहे कि, सुशांतची आ*त्म*ह*त्या नसून ती ह*त्या*च आहे. सुशांतला ज्यांनी मारले त्यांची नावे उघड करतो, मला पोलीस संरक्षण द्या !सुशांत सिंह राजपूतचा मित्र गणेश हिवरकर याने एका न्यूज वेबसाईटशी बोलताना हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्याने सांगितले कि सुशांतच्या मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी सुशांतच्या घरी मोठी पार्टी झाली होती आणि यामध्ये अनेक दिग्गज हस्ती सामील झाल्या होत्या.पार्टीदरम्यान असे काही घडले ज्याबद्दल सुशांत सर्वकाही जाणून होता. याशिवाय सुशांतची जुनी मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबत सुशांतला खूपच महत्वपूर्ण माहिती माहित होती. शिवाय गणेशने सुशांतचा जवळचा मित्र संदीप सिंह याचे देखील नाव घेतले आहे. तो म्हणाला कि याबाबतीत त्यालादेखील सर्वकाही माहिती आहे.पुढे सांगताना तो म्हणाला कि या प्रकरणामध्ये आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, आणि रिया चीक्रवर्तीचे कुटुंबीय यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान सीबीआयने या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती भाऊ शौविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.