बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपत आ*त्म*ह*त्या प्रकरणामध्ये यशराज फिल्म्सचे चेयरमन आदित्य चोपडाची चौकशी करण्यात आली. यादरम्यान आदित्य चोपडाने अनेक खुलासे केले. त्यांनी शेखर कपूर यांनी केलेले आरोप देखील चुकीचे आहेत म्हणून सांगितले. त्यांचे म्हणणे आहे कि सुशांत एकदम ठीक होता.पानी चित्रपटामुळे डिप्रेशनमध्ये नव्हता सुशांत :- पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबमध्ये आदित्य चोपडाने सांगितले कि सुशांतसोबत पानी चित्रपटाचा करार चांगल्या पद्धतीने संपुष्टात आला होता. पानी बद्दल जरासुद्धा डिप्रेशनमध्ये नव्हता. आदित्य यांचे म्हणणे आहे कि चित्रपटासाठी सुशांतने डेट्स देखील फिक्स केल्या होत्या. या चित्रपटावर काम देखील सुरु झाले होते आणि ५-६ करोड रुपये देखील खर्च झाले होते.पण पानी चित्रपटाला शेखर कपूर इंटरनेशनल लेवलवर प्रमोट करू इच्छित होते. तर आमची इच्छा होती कि या चित्रपटाचा भारतामध्ये जास्त बिजनेस व्हावा. शेखर कपूरच्या भांडणामुळे जवळ जवळ १५० करोड रुपये बजटच्या या चित्रपटामध्ये आम्ही रिस्क घेऊ इच्छीत नव्हतो. तेव्हा हा चित्रपट बंद करावा लागला.राम लीला चित्रपटाबद्दल आला खुलासा :- आदित्यने पुढे सांगितले कि सुशांत एक समजदार व्यक्ती होता, तो निराश जरूर झाला पण त्याला माहित होते कि इंडस्ट्रीमध्ये असे होतच राहते. करार संपुष्टात आल्यानंतर देखील सुशांत सोबत संपर्कात होतो आणि अनेकवेळा आमची भेट झाली.रामलीला बद्दल आदित्य चोपडाने सांगितले कि जेव्हा सुशांतला हा चित्रपट ऑफर झाला होता तेव्हा त्यावेळी यशराज फिल्म्स सोबत अभिनेत्याचा कोणताही करार नव्हता. यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरेल कि यशराज फिल्म्समुळे सुशांत रामलीला नाही करू शकला.हा होता शेखर कपूरचा जबाब :- आदित्य कपूरने शेखर कपूरचे आरोप चुकीचे आहेत असे सांगितले. शेखर कपूरने म्हंटले होते कि सुशांत पानी चित्रपटामुळे डिप्रेशनमध्ये होता. कारण या चित्रपटासाठी त्याने अनेक मोठे चित्रपट नाकारले होते. पानीचा करार तोडल्यानंतर यशराज फिल्मने सुशांत सोबत संपर्क तोडला.सुशांत सिह राजपूरने १४ जूनला मुंबईमधील आपल्या फ्लॅटमध्ये ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली होती. पोलीस या प्रकरणामध्ये चौकशी करत आहेत. तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत ३२ पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे.