बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यामधून त्याचे चाहते आणि कुटुंब अजून देखील सावरलेले नाहीत. एकीकडे सोशल मिडियावर सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूड मधील नेपोटिज्म बद्दल तीव्र पडसाद उमटत आहेत तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतचे कुटुंब अजून सावरलेले नाही. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने एक पोस्टद्वारे सांगितले आहे कि ती कोणत्या वेदनेमधून जात आहे, तिने आपल्या भावासोबत १० जूनला झालेल्या बातचीतचा एक स्क्रीनशॉट देखील शेयर केला आहे.श्वेताने भाऊ सुशांतच्या जाण्याचे दु:ख शेयर करताना आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन पार्टमध्ये पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टद्वारे तिने आपल्या भावाच्या जन्मापासून शाळा आणि बॉलीवूडपर्यंतच्या प्रवासाची स्टोरी सांगितली आहे. श्वेता द्वारे शेयर केलेला दुसरा पार्ट खूपच इमोशनल आहे, या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावासोबत १० जूनला केलेली बातचीत शेयर केली आहे.
बहिणीने केला अनेक वेळा मॅसेज :- त्यांचे चॅट पाहिले तर श्वेता आपल्या भावाला अमेरिकेला येण्यासाठी विनवणी करताना दिसत आहे. बहिणीने अनेक वेळा मॅसेज केल्यानंतर सुशांत एकदा रिप्लाय देतो आणि म्हणतो, खूप इच्छा होते दीदी. श्वेता त्याला पुन्हा एकदा येण्यास सांगते पण यावेळी सुशांत उत्तर देत नाही. श्वेताची पोस्ट येथे पहा.
अनेक नवसानंतर झाला होता सुशांत :- श्वेताने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये पार्ट- १ द्वारे सांगितले आहे कि तो खूपच त्रासात होता. त्यांनी म्हंटले कि मी हि समस्या सोशल मिडियावर यामुळे शेयर करत आहे कारण मी ऐकले आहे कि शेयर केल्याने त्रास कमी होतो. आपल्या पोस्टमध्ये श्वेताने सांगितले कि सुशांतच्या आईवडिलांना मुलगा हवा होता कारण त्यांची पहिली संतान मुलगा होता, त्याचा खूपच कमी वयामध्ये मृत्यू झाला होता. तर श्वेताच्या येण्यानंतर जेव्हा आईवडिलांनी अनेक नवस मागितले तेव्हा सुशांतचा जन्म झाला. त्याचा जन्म होताच श्वेता आपल्या भावासाठी खूपच प्रोटेक्टिव झाली होती. त्यांना सर्वांनी सांगितले होते कि सुशांत, त्यांच्याच मुळे आला आहे.
गुडिया-गुलशन :- त्यांनी म्हंटले कि खेळणे, डांस करणे, मस्ती करणे इथपासून शाळेमध्ये जाण्यापर्यंत सर्वकाही दोघांनी एकत्रच केले. श्वेताने सांगितले कि त्यांना घरामध्ये सर्व गुडिया म्हणत असत आणि सुशांतला गुलशन, लहापणापासून वेगळे होण्यापर्यंत गुडिया-गुलशन एकमेकांचे पर्याय आहेत.
सर्वकाही सोडून दीदीकडे आला होता सुशांत :- आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये शाळेतील एक किस्सा सांगताना श्वेताने सांगितले कि काही काळ शाळेच्या एकाचा बिल्डींगमध्ये क्लास असल्यामुळे जेव्हा श्वेता आणि सुशांत पुढच्या शिक्षणासाठी वेगळे झाले तेव्हा सुशांत एक दिवस सर्व काही सोडून आपल्या बहिणीकडे पोहोचला होता. याबद्दल त्याला विचारल्यास त्याने आपल्या बहिणीला सांगितले कि त्याला एकटेपणा आणि अस्वस्थ वाटत आहे आणि बेचैनी जाणवत आहे आणि त्याला आपल्या दीदीजवळ राहायचे आहे.
जर हे वाईट स्वप्न असते :- श्वेताने सांगितले कि कशाप्रकारे प्रत्येक चरणात ती सुशांतसाठी प्रोटेक्टिव राहिली. लग्नानंतर जेव्हा तिला अमेरिकेला जावे लागले तेव्हा ती सुशांतला आपल्या जवळ बोलावण्यासाठी मॅसेज आणि कॉल करायची. आपल्या पोस्टच्या शेवटी श्वेताने लिहिले कि, मी आजदेखील विचार करते कि जर मी त्याला सर्वांपासून प्रोटेक्ट केले असते, मी आज देखील विचार करते कि मी झोपून उठल्यानंतर तरी आपल्या भावाला पाहू शकेन, माझ्या एकदम जवळ आणि तेव्हा वाटेल कि हे सर्व काही एक वाईट स्वप्न होते आणि काही नाही, लव यू भाई.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.