बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांतला आ*त्म*ह*त्या करण्यास प्रवृत्त केल्यासाठीचे आरोप लागले आहे. मात्र एकेकाळी ते एकमेकांच्या खूप जवळ होते व एकमेकांसोबत खूप खुश दिसत होते. दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह आ*त्म*ह*त्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. जस जसा तपास पुढे जात आहेत तस तसा या प्रकरणामध्ये गुंतागुंत आणखीनच वाढत आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. जसा तपास पुढे जात आहेत तस तसा रियाविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. पण आता या सगळ्यावर रियाने मौन सोडलं आहे. मी सुशांतवर प्रेम केलं हाच माझ्या गुन्हा होता, असं रियाने म्हटल्याचं आजतक वाहिनीच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.सुशांत सिंह राजपूतने आ*त्म*ह*त्या केल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. रियानेच सुशांत सिंह राजपूतला मारायचा प्रयत्न केला आहे, त्याला विष दिलं असा आरोप सुशांत सिंहच्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर रिया चक्रवर्तीने आता या प्रकरणी तिची भूमिका मांडली आहे. सुशांतवर प्रेम करणं हाच माझा मोठा गुन्हा होता असं ती म्हणाली आहे.
“माझा एकच मोठा गुन्हा झाला मी सुशांतवर मनापासुन प्रेम केलं. तपासकार्यात मला जे काही विचारण्यात आलं त्याची मी सगळी उत्तरं बरोबर दिली आहेत. काहीच लपवलं नाही”, असं रिया चक्रवर्तीने म्हटलं.
सूत्रांनुसार, या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. युरोप ट्रीपमध्ये सुशांतसोबत नेमकं काय झालं होतं यावरदेखील स्पष्टीकरण दिलं आहे. इतकचं नाही तर सुशांतच्या घरातल्यांनी रियावर जे आरोप केले त्यावरही ती व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणाली पॅरिसमधील एका फॅशन शोसाठी मला आमंत्रित केले होतं. त्यामुळे मी फ्लाईट मध्ये बिझनेस क्लासचं तिकिट काढलं होतं. पण सुशांतने माझं तिकिट रद्द करून स्वत:हून फर्स्ट क्लासचं तिकिट काढले होते. तसंच सुशांतने युरोप ट्रिपचं नियोजन पण केले होतं. मला काहींचं न सांगता सर्व पैसे त्याने स्वत:च भरले होते. मी सुशांतची प्रेमिका होते त्यामुळे मी देखील युरोप ट्रिपसाठी एका पायावर तयार झाले होते. सुशांतला एका सुपरस्टार सारखं जगायला फार आवडायचं. लिव्ह लाईफ किंग साईज या तत्वामध्ये त्याला खूप विश्वास होता.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.