रामायण सागरच्या रामायणनंतर लव-कुश उत्तर रामायण आणि श्री कृष्ण सिरीयलची खूपच प्रशंसा केली गेली. या दोन पौराणिक सिरीयलमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. रामायणमध्ये बाल कलाकार कुश आणि कृष्णामध्ये तरुण कृष्णा च्या भूमिकेमध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला होता.

स्वप्नील जोशी अभिनित हे दोन्ही कार्यक्रम अनेक वर्षानंतर दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्यात येऊ लागले आहेत. या दोन्ही सिरियल्सला दर्शकांकडून खूपच प्रेम मिळाले. याच शोंचे काही अनुभव स्वप्नीलने देसीमार्टीनीसोबत शेयर केले आहेत. स्वप्नीलने सांगितले कि त्यावेळी तो घरापासून दूर सेटवर राहत होता. अशामध्ये दररोज घरी येणे जाणे होत नव्हते. यामुळे तो सेटवरच राहत होता. यादरम्यान त्याचे कुटुंबातील आईवडील किंवा आजी यांच्यापैकी कोणतरी एकजण सेटवर थांबत असे. स्वप्नीलने पुढे सांगितले कि रामानंद सागर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्याची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असत. त्यांच्यानुसारच सीन शूट केले जात होते ज्यामुळे शुटींग दरम्यान त्यांना कोणतीहि समस्या उद्भवत नव्हती. स्वप्नीलने हे सुद्धा सांगितले कि तो खूपच हुशार विद्यार्थी होता यामुळे त्याला डायलॉग लक्षात ठेवण्यास कोणतीही समस्या येत नव्हती.स्वप्नीलने आपल्या शाळेतील दिवस आठवताना सांगितले कि शाळेने त्याला कसे सपोर्ट केले होते. स्वप्नील सांगतो कि रामायणच्या शुटींगमुळे त्याच्या शाळेच्या अनेक सुट्ट्या झाल्या होत्या पण शाळेचे शिक्षक त्यांना हे सांगून सुट्ट्या देत होते कि तू देश सेवा करत आहेत. त्याच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेससुद्धा घेतले जात होते आणि वेगळी परीक्षा घेण्यात आली.स्वप्नील पुढे म्हणाल कि लॉकडाउनमुळे अनेक लोकांना समस्या येत आहेत पण यामध्ये पॉजिटिव गोष्टी देखील आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट हि आहे कि जर आपण घरातून बाहेर पडत नाही आहोत तर आपण सुरक्षित आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट हि आहे कि आपण कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतीत करत आहोत. नद्या साफ होत आहेत. गंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य झाले आहे. प्रदूषण कमी झाले आहे. हवा साफ झाली आहे. पृथ्वी माताने आपल्याला एक संधी दिली आहे कि आपला व्यवहार चांगला करावा. स्वप्नीलने सांगितले कि रामायणमध्ये काम मिळण्याच्या संधी पासून ते आतापर्यंत सर्व स्टोरी त्यांच्या Pillu tv या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.