अजय देवगनचा नुकताच वाढदिवस होऊन गेला आहे. अजय देवगनने फूल और कांटे चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात केली होती जो १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. १९९९ मध्ये अजय देवगनने प्रसिद्ध अभिनेत्री काजोल सोबत लग्न केले होते. प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू आता ४८ वर्षांची झाली आहे पण तिने अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. यासाठी तब्बूने अजय देवगनला जबाबदार धरले आहे.
अजय देवगन आणि तब्बू काही काळापूर्वी दे दे प्यार दे चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. या दरम्यान तब्बूला विचारले गेले कि तिने अजूनपर्यंत लग्न का केलेले नाही यावर तब्बूने सर्वस्वी अजय देवगनला जबाबदार ठरवले आहे. अजय देवगनने तब्बूच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले कि, तब्बूला माझ्या सारखा मुलगा हवा होता, जो तिला आतापर्यंत मिळाला नाही. यामुळे ती अजूनही अविवाहीत आहे.अजय देवगन यावर पुढे म्हणाल कि काजोलला हि सर्व हकीकत माहिती आहे आणि तिला यावर कोणतीही अडचण नाही. ती म्हणते कि या सर्व नॉर्मल फीलिंग आहेत मला जरासुद्धा वाईट वाटत नाही. यानंतर तब्बूने सांगितले कि मी अजय देवगनला गेल्या २५ वर्षांपासून ओळखते. अजय माझा कजीन समीरचा शेजारी आणि जवळचा मित्र असायचा. हे दोघेही माझ्यावर खूप बारीक नजर ठेऊन होते.
जेव्हा कोणताही मुलगा माझ्यासोबत बोलायचा तेव्हा हे दोघेही त्याला मारहाण करायचे. दोघेही खूप मोठे गुंड होते. तब्बूने एका मुलाखती दरम्यान हे सुद्धा सांगितले आहे कि मी प्रत्येक दुसऱ्या दिवशी अजयला सांगते कि त्याने माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधावा.
हे मी त्याला चेष्टेमध्ये सांगते. आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. अजय खूपच प्रोडक्टिव आहे. तब्बू आणि अजय अनेक चित्रपटांमध्ये एकत्र पाहायला मिळाले आहेत, दोघांच्या जोडीला देखील दर्शकांनी देखील चांगली पसंती दिले आहे.