अजय देवगनचा बहुप्रतिक्षित तानाजी हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगले रिव्हियू मिळाले होते. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. तानाजी चित्रपट सोबत दीपिका पदुकोणचा छपाक व साउथ कडील सुपरहिरो रजनीकांतचा दरबार हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. परंतु इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत तानाजीने पुढे मजल गाठली. अजय देवगण च्या करियर मधील तानाजी हा शंभरावा चित्रपट असून त्यापासून अजयला व त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या व त्या चित्रपट प्रदर्शनानंतर एका आठवड्याच्या आताच पूर्ण देखील झाल्या.

एका प्रसिद्ध वेबसाईट ने दिलेल्या माहितीनुसार मनाची चित्रपटाने भारतामध्ये पहिल्या दोन दिवसातच ३५.६७ करोड रुपयांची कमाई केली. एवढेच नव्हे तर पहिल्याच दिवसात या चित्रपटाने १५ . १० करोड रुपये गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने वेग धरून तब्बल २०.५७ करोड रुपये कमावले. नुसते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे व सगळीकडे हा चित्रपट चांगले नाव कमवत आहे. आतापर्यंत तानाजी चित्रपटाने संपूर्ण जगभरात ५२ करोड रुपयांची कमाई केली आहे.पाहिले दोन दिवस बघता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे सकाळचे शो ६५.०१% फुल असतात. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने या ६ चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या हाउसफुल ४ ला तिसऱ्या दिवशी २७% ओपनिंग मिळाली होती तर वॉर ला ३०%, दबंग ३ ला ४०%, भारत ला ४२%, गुड न्यूज ला ४५.५८% आणि मिशन मंगल तिसऱ्या दिवशी ५८ % ओपनिंग मिळाली होती.

या चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची कमाई बघता पुढल्या दिवशी हा चित्रपट २७ करोड रुपयांच्या आसपास कमाई करू शकतो. तानाजी चित्रपट बनवण्यासाठी १५० करोड रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे आता हा खर्च भरून काढण्यासाठी तानाजी चित्रपटाला २०० करोड रुपये पार करण्याची आवश्यकता आहे.

या चित्रपटात अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, अजिंक्य देव यांसारखे मोठे कलाकार होते. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगन यामध्ये तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे तर सैफ अली खानने उदयभान राठोड ची भूमिका साकारली आहे.