द ग्रेट खली ला कोण ओळखत नाही? अगदी WWE न बघणारे सुद्धा द ग्रेट खली ला चांगलेच ओळखतात. द ग्रेट खली उर्फ दिलीप सिंह राणा ने WWF च्या रिंगणात स्वतःचे नाव तर कमावलेच पण भारताचे नाव ही उज्वल केले. द ग्रेट खली हे असं नाव ज्याच्याशी दोन हात करण्यासाठी भल्या भल्या रेसलर्स च्या छातीत धडकी भरून येते. ह्या ७ फूट उंचीच्या महामानवाने बटिस्टा आणि अंडरटेकर सारख्या दिग्गजांना चारीमुंड्या चीत केले आहे.

त्याचा दिलीप सिंह राणा ते ग्रेट खली बनण्यापर्यंतचा प्रवास जितका रोचक होता तसच त्याचे वयक्तिक आयुष्य ही काही कमी रोचक नव्हतं. बिग बॉस च्या चौथ्या सीजन मध्ये तो स्पर्धक ही राहिला आहे. त्याच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक असलेला भाग म्हणजे त्याचा विवाह. त्याच्या पत्नी चे नाव हरमिंदर कौर आहे. कोण आहे हरमिंदर कौर? काय आहेत तिच्या बद्दल च्या खास गोष्टी? चला वाचूया ह्या लेखात.

१) खली च्या पत्नी चं नाव हरमिंदर कौर आहे. तिचा जन्म १२ जानेवारी १९७१ ला दिल्ली येथे झाला होता. तिच्या वडिलांचे नाव राजिंदर पाल सिंह आणि आई चे नाव चरनजीत कौर आहे. सनी लिओनी चे खरे नाव ही चरनजीत कौर आहे. असो, आपण मूळ मुद्द्यावर येऊ. आपण वाचलंच असेल हरमिंदर कौर आपल्या आई चे आडनाव लावते. भारतात काही उच्च घराण्यामध्ये किंवा उच्च जातीं मधेच हे पाहायला मिळते.२) हरमिंदर कौर ह्यांचे शिक्षण स्पेन च्या माद्रिद येथे अल्काला युनिव्हर्सिटीत झाले आहे. असे असले तरी ती एशियन इंडियन असून तिच्याकडे भारतीय नागरिकता आहे. भारतात दिल्ली युनिव्हर्सिटी मधूनच तिने आपले शिक्षण इंग्लिश विषय घेऊन पूर्ण केले आहे.

३) हरमिंदर कौर पेश्याने अभिनेत्री आहे जिला तिची फिल्म “कौब्दि कलायी” साठी ओळखले जाते. ही फिल्म २००६ मध्ये आली होती. हरमिंदर कौर ह्यांनी ह्या एकाच चित्रपटात काम केले असले तरी त्यांना ह्या चित्रपटापासून खूप लौकिक मिळाला होता.४) हरमिंदर कौर लाइमलाईट मध्ये खली शी विवाह केल्या नंतर आली. ह्या व्यतिरिक्त ती सोशल मीडिया पासून दूर असते त्यामुळे तिच्याबद्दल जास्त माहिती इंटरनेट वर उपलब्ध नाही. असे असले तरी दोघांना आजही लोकं सेलिब्रिटी कपल म्हणूनच ओळखतात कारण त्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली आहे.

५) खली आणि हरमिंदर ह्यांना एक मुलगी असून तिचं नाव अलवीन राणा असे आहे. अलवीन चा जन्म २६ फेब्रुवारी २०१४ साली म्हणजेच लग्नानंतर १२ वर्षांनी अमेरिकेत एका हॉस्पिटल मध्ये झाला. दोघांचे ही अरेंज मॅरेज आहे.खली ने आपल्या रेसलिंग करियर ची सुरुवात साल २००० मध्ये केली होती आणि २००७ मध्ये तो वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन झाला होता. दोघांनी २००२ मध्ये लग्न केलं होतं. खली आजही आपल्या यशाचे श्रेय त्याची पत्नी हरमिंदर कौर ह्यांनाच देतो. खली प्रोफेशनल रेसलर बनण्या आधी पंजाब पोलीस मध्ये काम करत होता. हल्लीच तो अंबुजा सिमेंट च्या जाहिरातीतही दिसला होता. आजही त्याचे फॅन्स यु ट्यूब वर त्याच्या जुन्या फाइट्स आवडीने बघतात. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करायला विसरू नका.