जेंडर चेंज करून पुरुषापासून स्त्री बनले हे ६ कलाकार, बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींना देखील देतात टक्कर !

3 Min Read

बॉलीवूडचे जगन खूपच वेगळे आहे. इथे अनेक कलाकार असे देखील आहेत जे पुरुषाचे आयुष्य जागून कंटाळले होते. अशामध्ये त्यांनी आपले जेंडरचे चेंज केले आणि आपले नशीब बदलून टाकले. इथे आपण काही अशाच कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

गौरी अरोड़ा :- स्प्लिट्सविलामध्ये पाहायला मिळालेली गौरी अरोड़ा कधी काळी पुरुष होती. तिने आपले जेंडर चेंज केले होते. तिचे नाव गौरव अरोडा असे होते. तिला खूपच लहानपणापासून मुलींचे कपडे घालायची आवड होती. मुलींप्रमाणेच तिची वागणूक होती. इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडलमध्ये देखील तिने भाग घेतला आहे. मुलगी बनण्याअगोदर ती एक हँडसम मुलगा जरूर होती पण तिला मुलगीचे रूप इतके पसंत होते कि आपले करियर बनवण्यासाठी तिने स्त्रीचे रूप घेतले.शिनाता सांघा :- दक्षिण आशियाची लोकप्रिय ट्रांसजेंडर मॉडल म्हणून शिनाता सांघाला ओळखले जाते. तिने जेव्हा जेंडर चेंज केले होते तेव्हा तिला अनके ब्यूटी अवार्ड देखील मिळाले. अनके प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजवर देखील तिने आपली जागा बनवली आहे. तिने २०१०, २०११ आणि २०१२ सलग तीन वेळा जगातील सर्वात सुंदर ट्रांसजेंडरचा किताब आपल्या नावावर केला आहे.निक्की चावला :- निक्की चावला पाहून कोणीदेखील म्हणून शकत नाही कि ती एक मुलगा होती. दिल्लीची राहणार इ निक्की चावलाने २००९ मध्ये आपले जेंडर चेंज केले होते. आता ती टॉप मॉडल्समध्ये गणली जाते. तिने जेव्हा आपले जेंडर बदलण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा तिचे कुटुंबीय या निर्णयाच्या विरुद्ध होते. तरीही निक्कीने याच्या विरुद्ध जाऊन जेंडर चेंज केले.गजल धालीवाल :- गजल धालीवालने एक लेखक आणि अभिनेत्री म्हणून आपली ओळख बनवली आहे, ती कधी काळी पुरुष होती. तिने आपले जेंडर बदलून घेतले होते. याबद्दल तिने म्हंटले होते कि लहानपणापासूनच तिने जाणीव झाली होती कि ती मुलगी आहे. कुटुंबियांना देखील तिने याबद्दल सांगितले होते. नंतर अनेक ऑपरेशन केल्यानंतर ती मुलगी झाली.बॉबी डार्लिंग :- बॉबी डार्लिंगला पहिल्यांदा ताल चित्रपटामध्ये पाहिले गेले होते जो १९९९ मध्ये आला होता. हा तिच्या करियरमधील पहिला चित्रपट होता. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिने आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. लहानपणी ती पंकज शर्मा नावाने ओळखली जात होती. २०१० मध्ये पंकजणे ब्रेस्ट इंप्लांट्स करून घेतले होते आणि आपले नाव पाखी शर्मा ठेवले होते.तसे बॉलीवूडमध्ये आल्यानंतर तिने पुन्हा आपले नाव बदलले आणि आपले नाव बॉबी डार्लिंग असे ठेवले. तिने हंसी तो फंसी, क्या कूल हैं हम ३ आणि पेज ३ चित्रपटामध्ये काम केले आहे. इतकेच नाही तर बिग बॉसमध्ये देखील तिने २००६ मध्ये भाग घेतला होता.

अंजली लामा :- अंजली लामाचा जन्म नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झाला होता. सर्वात पहिला ती मॉडलिंग करत होती. लहानपणी तिचे नाव नवीन वाहिबा असे होते. नंतर तिने जेंडर बदले आणि आपले नाव अंजली लामा असे केले. सर्वात पहिला तिने काठमांडूमध्ये एक मॉडलिंगमध्ये भाग घेतला होता.या दरम्यान तिच्या गावातील एका व्यक्तीला माहित झाले कि अंजली एक ट्रांसजेंडर महिला म्हणून आयुष्य जगत आहे. अशामध्ये त्याने अंजलीच्या कुटुंबाला याबद्दल सांगितले. यानंतर अंजलीच्या कुटुंबाने तिच्यासोबतचे सर्व नाते तोडून टाकले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *