बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते व अभिनेत्री आहेत जे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करत असतात. अमिताभ बच्चन प्रियंका चोपडा आमिर खान यांसारखे अनेक कलाकार गरीब अनाथ लोकांसाठी मदत म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. यामध्ये काही कलाकार असेदेखील आहेत ज्यांनी या अनाथ मुलांना दत्ता घेऊन त्यांचे पालन पोषण, त्यांचे शिक्षण, त्यांच्या इतर गरजा या सर्व गोष्टींची काळजी घेतात. आज या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांची माहिती सांगणार आहोत ज्यांनी या अनाथ मुलांचे जीवन सुधारण्यास मदत केली.

१) रविना टंडन –  रवीनाने अनिल थडानी सोबत लग्न केले. परंतु वयाच्या २१ व्या वर्षी तिने ८ व ११ वर्षाच्या पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले. या दोघांच्याही पालनपोषणाची जबाबदारी रवीना नीट पार पडत असते.
२) सलीम खान – संपूर्ण खान परिवाराची लाडकी असलेली अर्पिता खान शर्मा ही सलीम खान यांनी दत्तक घेतले होती. सलीम खान यांना अर्पिता लहान असताना रस्त्यावर रडत बसलेली दिसली होती. त्यामुळे तिची दया येऊन त्यांनी तिला घरी आणले आणि खान परिवाराचे सदस्य बनवले. खान परिवाराच्या लाडके असलेल्या अर्पितावर परिवारातील प्रत्येक सदस्य कडून इतका प्रेमाचा वर्षाव होतो की तिला बघून असे वाटत नाही की तिला दत्तक घेतले आहे. अर्पिताचे लग्न देखील तिच्या तिन्ही भावांनी मोठ्या थाटामाटात करून दिले होते.
३) सुष्मिता सेन – अनेक लोकांनी नावे ठेवून तसेच मनाई करून देखील सुष्मिता सेनने वयाच्या २५ व्या वर्षी रीना आणि अलीशा या दोन मुलींना दत्तक घेतले. त्याचप्रमाणे सुष्मिता गरीब कुटुंबांसाठी व अनाथ लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत करत असते.
४) मिथुन चक्रवर्ती – मिथुन चक्रवर्ती ला कचऱ्याच्या डब्यात एक छोटी मुलगी मिळाली होती. मिथुन ने या मुलीला दत्तक घेऊन तिचे नाव दिशानी असे ठेवले. मिथुन ने दिशानीला महाक्षय, नमाशी आणि उस्मय या त्यांच्या तिनही मुलांसोबत मोठे केले.
५) सनी लियोन – सनी लियोन एका अनाथ आश्रमातून निशा नावाचा दीड वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते. निशाच्या सावळ्या रंगामुळे तिला कोणीही दत्तक घेत नव्हते परंतु सनी लिओनने तिला दत्तक घेऊन तिचे आयुष्य बदलून टाकले. आता निशा तिच्या खेळकर हास्यामुळे मीडियाच्या कॅमेर्‍यांचे आकर्षण बनत असते.