असे बोलतात कि प्रेम करते वेळी पैशांकडे बघितले जात नाही. परंतु वेळ जेव्हा लग्नापर्यंत येते तेव्हा अनेक मुली पैसेवाला नवराच बघतात. पैसा खिशात असला की आलिशान जीवन जगायला मिळते. तर यात बॉलिवूडची अभिनेत्री का मागे राहतील. त्यांनीसुद्धा स्वतःसाठी श्रीमंत नवरे शोधले आहेत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.
रविना टंडन – रवीना शिवा २१ वर्षाची होती तेव्हा तिने एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन समाजासमोर चांगले उदाहरण ठेवले होते. त्यानंतर रविनाने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी सोबत लग्न केले. मुंबईतील फिल्म प्रोडक्शन हाऊस अनिल हे मोठे नाव आहे.अनीलकडे भरपूर पैसा आहे. रविनाने २००४ मध्ये अनिल सोबत लग्न केले होते.
सेलिना जेटली – बॉलीवूड मध्ये नो इन्ट्री, गोलमाल रिटर्न यासारख्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सेलिना जेटलीला चित्रपट सृष्टी तितकेसे यश मिळाले नाही. त्यामुळे तिने समजदारी दाखवून विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आणि तिने पीटर हाग सोबत लग्न केले. पीटर Emaar Hospitality Group चे डायरेक्टर ऑफ मार्केटिंग आहेत. त्यासोबत या सोबत त्यांचे सिंगापूर आणि दुबई मध्ये देखील हॉटेल आहेत.
अमृता अरोरा आणि शकील – बॉलिवुड मधील १० श्रीमंत नवऱ्या पैकी एक आहे. ते Courtyard by Marriott चे मालक आणि Redstoneचे डायरेक्टर आहेत. अमृता अरोरा चे बॉलिवूडमधील करिअर फ्लॉप ठरले. शकील चे याआधी नेपाळच्या रॉयल फॅमिली मधून असलेल्या निशा सोबत लग्न झाले होते. निशा व अमृता या दोघी कॉलेज पासूनच्या मैत्रिणी होत्या. निशाणी अमृतावर आरोप लावला की अमृताने तिच्यापासून तिचा नवरा पळवला.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा – शिल्पा शेट्टी राज कुंद्रा ची दुसरी पत्नी आहे. राज कुंद्रा च्या पहिल्या पत्नीने शिल्पा शेट्टी वर आरोप लावले होते की शिल्पा मुळे राज तिच्यापासून दूर झाला. परंतु राजने या आरोपांचे खंडन करीत सांगितले की तो तसाही त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्पोट देणारच होता. राज भरता सोबतचे विदेशात देखील अनेक बिझनेस आहे.
श्रीदेवी आणि बोनी कपूर – श्रीदेवी ही बोनी कपूरची दुसरी पत्नी आहे. खरंतर श्रीदेवीची बोनी कपूर च्या पहिल्या पत्नी सोबत चांगली मैत्री झाली होती. सुरुवातीला काही दिवस श्रीदेवी बोनी कपूरच्या घरीसुद्धा राहायची. एवढेच नव्हे तर काही काळ दोघांनी एकमेकांना भाऊ-बहीण मानून राखी बांधली होती. परंतु एकत्र राहून श्रीदेवी बोनी कपूर यांच्यात प्रेम जमले. आणि बोनी कपूर त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. बोनी कपूर भरपूर श्रीमंत आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की ते त्यांच्या कुटुंबावर दर महिना २५ लाख रुपये खर्च करतात.
विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर – सिद्धार्थ रॉय कपूर हे UTV ग्रुप चे मालक आहेत. ते मालिका व चित्रपटांची निर्मिती करतात. सिद्धार्थ चे विद्यासोबत दुसरे लग्न झाले आहे. दोघांनी १४ डिसेंबर २०१२ मध्ये लग्न केले होते.