ही आहेत सेलिब्रिटींची आलिशान घरं, या घरातच मिळतो स्वर्ग सुखाचा आनंद ! ही आहेत 6 इंडियन सेलिब्रिटींची आलिशान घरं, या घरातच मिळतो स्वर्ग सुखाचा आनंद.. घर भलेही वीट आणि सिमेंटने बनवलं जातं. मात्र त्याला घरपण देण्याचं काम त्या घरातील माणसं करत असतात. मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्यांचं एक आलिशान घर असावं. असं असलं तरी सर्वसामान्य लोक याबाबतीत जरा मागे राहत असले तरी सेलिब्रिटींसाठी हे तितकसं अवघड नसतं. तरीच त्यांना जेव्हा केव्हा संधी मिळते, ते आपल्या घराला अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात.आज आपण अशाच काही आलिशान घरांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.. सेलिब्रिटींनी यासाठी भरपूर पैसे खर्च केलेत, तुम्हीही बघा यांची एक झलक.

अँटिलिया :-देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांचं ‘अँटिलिया’ हे घर देशातच नाही तर जगभरातील महागड्या घरांमध्ये मोजलं जातं. 4 लाख स्वेअर फुटांवर पसरलेले हे घर एखाद्या महलपेक्षा कमी नाही.
आलिशान आहे हे घर – जवळजवळ 11 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे घर 27 मजली असून त्यात 3 हेलिपॅड, 9 लिफ्ट, 1 स्पा, 1 मंदिर, एक बॉलरूम आहे. त्याचसोबत एक सिनेमहॉल, योगा स्टुडिओ, एक आईस्क्रीम रूम आणि 2- 3 पेक्षा अधिक स्विमिंग पूल आहेत.

हृतिकचं घर :-3 हजार स्क्वेअर फुटांचं हे घर त्याच्यासारखच अगदी कूल आहे. त्यानं आपलं 4BHK घर योग्य पध्दतीने डिझाईन केलंय. असं दिसतं हृतिकचं घर- हृतिकचं घर इतर ऍक्टर्सच्या घराच्या मनाने फारच वेगळं आहे. त्यानं घरात वूडन मटेरियल, कलरफुल स्टोन्स आणि पेंटींग्सचा वापर करत घराची सजावट केली आहे.

शाहरुख खानचं ‘मन्नत’:-बॉलिवूडचा किंग खान रियल लाईफमध्ये सुद्धा किंग सारखं आयुष्य जगतो. या गोष्टीचं एक उदाहरण म्हणजे त्याचा ‘मन्नत’ हा बांगला आहे. 6 लाख स्क्वेअर फुटांवर पसरलेल्या या घराची किंमत आजच्या घडीला जवळपास 2 हजार करोड रुपये आहे. सगळ्या सोयी- सुविधांनी सज्ज आहे शाहरुखचं घर- सगळ्या सोयीसुविधा त्याच्या घरात आहेत, त्यात जीमपासून बॉक्सिंग रिंग, ऑफिस, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट एरिया यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. याचं इंटेरिअर देखील रॉयल पद्धतीनं सजविण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चनचं ‘जलसा’:-अमिताभ बच्चन यांचं घर ‘जलसा’ मुंबईत येणाऱ्यांसाठी एखाद्या ट्युरिस्ट स्पॉट पेक्षा कमी नाही. जेव्हा केव्हा अमिताभ मुंबईत असतात तेव्हा प्रत्येक संडेला ते आपल्या चाहत्यांना भेटत असतात. वेगळी आहे सजावट- त्यांच्या घराची सजावट अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. घराचं इंटेरिअर अतिशय सुंदररीत्या बनविण्यात आलं आहे. जे पाहताच मन प्रसन्न होतं.

जॉन अब्राहमचं पेंटा हाऊस :-बॉलीवुडचा हँडसम हंक जॉन अब्राहम मुंबईत सी फेस जवळील पेंटा हाऊस अपार्टमेंट मध्ये राहतो. त्याचं म्हणणं असं आहे की तुमचं घर तुमच्या कॅरेक्टरबद्दल सांगत. त्यामुळे त्याने त्याच घर अतिशय सुंदररित्या डिझाईन केलंय. प्रत्येक गोष्टीत आहे क्लास- जॉनच्या घरात वुडन मटेरियलचा जास्त वापर करण्यात आला आहे. या आलिशान घरात बाथरूम पासून लिविंग एरिया पर्यंत सगळं काही क्लास आहे.

किंगफिशन व्हीला :-गोवा येथे असलेला हा आलिशान बंगला ‘किंगफिशन व्हीला’ या नावाने ओळखला जातो. एकेकाळी हा आलिशान बंगला विजय मल्ल्याचा आशियाना होता, मात्र कर्ज घेऊन देश सोडून पळून गेल्यानंतर मल्ल्याचा हा बंगला ऍक्टर आणि बिजनेसमॅन सचिन जोशीने विकत घेतला. धरतीवर जन्नत आहे ‘किंगफिशन व्हीला’- तब्बल 12 हजार 350 स्क्वेअर फुटांवर पसरलेला हा व्हीला भलताच आलिशान आहे. या घरात एक दिवस राहणं म्हणजे स्वर्गासमान अनुभव घेतल्यासारखं आहे.