हे पाच अभिनेते आहेत त्यांच्या सासू सासर्‍यांचे लाडके जावई !

2 Min Read

आजकाल प्रत्येक अभिनेता लग्न करून आपले घर बसवत आहे. यामध्ये तुम्ही काही अभिनेत्यांच्या नातेवाईकांना टीव्हीवर बघितलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशा पाच अभिनेत्यांना बद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या सासू-सासर्‍यांचे लाडके जावई आहेत.

१) सैफ अली खान – तुम्हाला माहितीच असेल की सैफ अली खान यांनी रणधीर कपूर व बबीताची मुलगी करीना कपूर सोबत लग्न केले. रणधीर व बबीता या दोघांनी सुद्धा एकेकाळी मोठा पडदा गाजवला होता. रणधीर व बबीता दोघेही सैफला त्यांच्या मुलाचा सारखेच मानतात.
२) शर्मन जोशी – शर्मन जोशी हा आपल्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा असेल, त्याने ३ इडीयटस मध्ये अप्रतिम ऍक्टिंगचा नमुना दाखवला आहे. शर्मनने प्रेम चोपडा यांची मुलगी प्रेरणा चोपडा सोबत लग्न केले. प्रेम चोपडा आणि शर्मन जोशी यांचे नाते सासरे जावई असे असले तरी देखील यांच्या मध्ये खूप चांगली मैत्री आहे. शर्मनचा हा चित्रपट तुफान गाजला होता.
३) धनुष – धनुष याने साऊथ चित्रपटासोबतच बॉलिवूड मध्ये रांझना सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. बॉलीवूड आणि साऊथ कडील चित्रपटांमध्ये काम केलेल्या धनूषचे लग्न सुपरस्टार रजनीकांतच्या मुली सोबत झाले. रजनीकांत धनुष वर त्यांच्या सख्ख्या मुलांप्रमाणेच प्रेम करतात.
४) अक्षय कुमार – अक्षयकुमारने दिवंगत अभिनेता राजेश खन्ना व अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी ट्विंकल खन्ना सोबत लग्न केले. डिंपल व अक्षय कुमार मधील नाते खूप घट्ट आहे. बॉण्डिंग देखील खूप स्ट्रॉंग आहे. ही सासू व जावयाची जोडी अनेकदा वेगवेगळ्या पार्टी व कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असते. एवढेच नाही तर अक्षयने त्याच्या सासूसोबत म्हणजेच डिम्पल सोबत तीन चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे.
५) अजय देवगन – अजय देवगण आणि प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच लग्न १९९४ साली अगदी धुमधडाक्यात झालं. अजयचे आणि काजोल ची आई सरोज सोबतचे नाते एकदम मैत्रीपूर्ण आहे. अजय कित्येक सण-समारंभ काजोलच्या कुटुंबासोबत साजरे करत असतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *