मित्रांनो बॉलीवूड च्या दुनियेत प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी ओळख आहे. कोणी अभिनय छान करतो तर कोण उत्तम डान्सर आहे. काही कलाकारांचे लूक्स खूप छान आहेत त्यामुळे अनेक मुली त्यांच्यावर फिदा आहेत. प्रत्येक कलाकाराचे त्यांचे स्वतःचे प्लस पॉईंट्स आहेत. पण आज आम्ही तुम्हाला ह्या लेखामध्ये काही अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यामध्ये काहीनाकाही शारीरिक कमजोरी आहे आणि त्यांनी त्यावर मात करून आपली ओळख निर्माण केली आहे.
१) ह्रितिक रोशन – ह्रितिक रोशन ला तुम्ही सर्वच ओळखत असाल. मुली त्याच्या लूक्स आणि डान्स वर फिदा आहेत. एवढंच नाही तर तो अभिनय ही खूप छान करतो. त्याचा पहिला चित्रपट काहो ना प्यार है ब्लॉकबस्टर ठरला होता. हल्लीच त्याचा वॉर हा ऍक्शनपट येऊन गेला होता. त्याच्या शारीरिक कमजोरी बद्दल सांगायचे झाले तर ह्रितिक ला त्याच्या एका हाताला २ अंगठे आहेत. तसेच तो बोलताना सुद्धा खूप अडखळत बोलतो. पण ह्यावर त्याने मात केली असून तो आता अँकरिंग ही करू शकतो.
२) इलियाना डिक्रूज – इलियाना डिक्रूज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल. बॉलीवूड मध्ये बऱ्याच सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. अक्षय कुमार सोबत तिने रुस्तम ह्या चित्रपटात तिने काम केलं आहे. तसेच तिने बादशहो आणि मै तेरा हिरो ह्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं असून ती साऊथ इंडिया मध्ये खूप लोकप्रिय आहे. इलियाना डिक्रूज ने जेव्हा बॉलीवूड मध्ये पदार्पण केले तेव्हा तिच्या कंबरेमध्ये समस्या होती. पण त्याबद्दल तिने कोणालाच सांगितले नाही. नंतर सर्जरी करून तिने ह्यावर मात केली.
३) अर्जुन कपूर – निर्माते बोनी कपूर ह्यांचा मुलगा अर्जुन कपूर बॉलीवूड मध्ये खूप वर्षांपासून आपली जागा राखून आहे. हल्लीच त्याचा पानिपत हा आशुतोष गोवारीकर ह्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा येऊन गेला. चित्रपटाला समीक्षकांची वाहवा मिळाली पण बॉक्स ऑफिस वर चांगलाच आपटला. बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्याअगोदर अर्जुन खूप जाड होता. इशकजादे ह्या चित्रपटापासून अर्जुनने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते.

४) सलमान खान – सुपरस्टार सलमान खान चा दबंग ३ सध्या सिनेमागृहांमध्ये चांगली कमाई करत आहे. सलमान ने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिली असून त्याची पूर्ण भारतात जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. सलमान ला गेल्या अनेक वर्षांपासून एक शारीरिक आजार होता. “त्रिंगमीनल न्यूरालजिया”, ह्यामध्ये त्याच्या चेहेऱ्याला, जबड्यामध्ये आणि डोक्याला असंख्य वेदना होत होत्या. २०११ पासून त्याला हा आजार होता असे म्हटले जाते. पण हल्लीच त्याने अमेरिकेत जाऊन ह्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.
५) शाहरुख खान – बॉलीवूड चा बादशाह शाहरुख खान ला खूप वर्षांपासून पाठदुखीचा त्रास आहे. हा त्रास त्याला त्याच्या “दिल से” चित्रपटापासून सुरु झाला होता तो आजवर कायम आहे. असे असून सुद्धा तो आजही त्याच्या चित्रपटांमध्ये उत्साहाने काम करत असून त्याच्याकडून शिकण्यासारखे बरच काही आहे. त्याचा पाठदुखीचा त्रास इतका सिरिअस आहे कि शूटिंग च्या वेळी एक डॉक्टर त्याच्यासोबत नेहमी असतो.
६) सोनम कपूर – आजकाल बॉलीवूड मध्ये तशी कमीच दिसणारी सोनम कपूर काहीनाकाही गोष्टींमुळे चर्चेत नेहमी असते. लग्न झाल्यापासून सोनम सध्या बॉलीवूड पासून लांब आहे. असे असले तरी सोनम ने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनम ला डायबिटीज सारखा भयंकर आजार असून ती पूर्ण आयुष्य ह्या आजाराशी लढते आहे. तिचे उपचार चालू असून तिचा डायबिटीज सध्या नियंत्रणात आहे.
७) अमिताभ बच्चन – महानायक अमिताभ बच्चन बॉलीवूड मध्ये अनेक दशकांपासून काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून लोकं आजही त्यांचे जुने चित्रपट आवडीने बघतात. अमिताभ बच्चन ह्यांना “म्यास्थेनिया ग्रॅव्हिस” ह्या आजाराने ग्रासले आहे. हा आजार बारा होऊ शकत नाही, पण उपचारांनी खूप मदत मिळते. ह्या आजारामध्ये मांसपेशी आतून खाल्ल्या जाऊन कमजोर होतात.
माहिती आवडली असल्यास लाईक करून नक्की शेयर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.