बॉलिवूडमधील हे अभिनेते आता पूर्वीपेक्षा जास्त वेगळे दिसतात, नंबर ४ आणि ८ ला पाहून तर चकित व्हाल !

6 Min Read

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करून देखील त्यांच्या वाटेला हवे तसे यश आले नाही. त्यामुळे सध्या ते फारसे कुठे दिसत नाहीत. चित्रपटांपासून दूर राहिल्यामुळे यांच्या दिसण्यात सुद्धा इतका बदल झाला आहे की त्यांना ओळखणे देखील कठीण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही दहा अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत पूर्वीपेक्षा आता खूपच वेगळे दिसतात.

१) उदय चोपडा – यश चोपडा यांचा लहान मुलगा उदय चोपडाने २००० मध्ये आलेल्या शाहरुख खान ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्या मोहब्बते या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगला चालला असला तरी उदय चोपडाला मात्र त्याच्या करिअरमध्ये तितकेसे यश मिळवता आले नाही. उदयाचा चित्रपट सृष्टी पासून दूर असतो. काही दिवसांपूर्वीच मीडियाच्या कॅमेरामध्ये त्याचे काही फोटो कैद झाले. परंतु या फोटो मधून तो उदय चोपडा आहे हे सांगणे मुश्कील होते, इतका तो बदललेला दिसतो.२) विवेक मुशरान – विवेकने सौदागर या चित्रपटामधून मनिषा कोईराला सोबत बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना त्या वेळी खूपच पसंतीस आली होती. दहावी हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला की या चित्रपटाची सिल्वर जुबली देखील साजरी केली. एकीकडे या चित्रपटाच्या यशाची चर्चा होत होते तर दुसरीकडे कुमार आणि राजकुमार यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या विवेक मुशरान सारखा सुपरस्टार बॉलिवूडला मिळत होता. सौदागर चित्रपटानंतर विवेकने अनेक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आणि ते यशस्वी देखील झाले. परंतु हळूहळू त्यांची प्रसिद्धी कमी होत गेली आणि विवेकने छोट्या पडद्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर विवेकने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. आता त्यांचा लुक खूप बदलला आहे.३) फरदीन खान – अभिनेता फिरोज खानचा मुलगा फरदिन खानचे नाव चॉकलेट बॉय म्हणून घेतले जायचे. त्यांच्या लुक वर मुली फिदा असायच्या. १९९८ मध्ये आलेल्या प्रेम अगं या चित्रपटांमधून फरदिनने त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. परंतू ते चित्रपट सृष्टीत तितकेसे टिकू शकले नाहीत. २०१० मध्ये आलेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटांमध्ये शेवटी फरदिनला बघण्यात आले होते. त्यानंतर मात्र कोणत्याही चित्रपटामध्ये ते दिसले नाहीत. त्यांच्या दिसण्यात सुद्धा खूप बदल झाला असून वजन पण खूप वाढले आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.४) हरमन बावेजा – हरमन बावेजा ने जेव्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती तेव्हा त्याच्याकडे बघुन असे वाटले होते की येत्या काळात हा अभिनेता सुपरस्टार अभिनेत्यांना मोठी टक्कर देणारा ठरेल परंतु प्रत्यक्षात मात्र असे काहीच झाले नाही. हरमन खूप लवकर इंडस्ट्री मधून गायब झाले. चित्रपट दिग्दर्शक हैरी बावेजा आणि निर्माता पम्मी बावेजा यांचा मुलगा असलेल्या हरमनने २००८ मध्ये आलेल्या लव्ह स्टोरी २०५० या चित्रपटांमधून पदार्पण केले होते. २००९ मध्ये दिग्दर्शक हैरी बावेजाने त्यांच्या मुलासाठी व्हाट्स युवर राशी चित्रपट देखील बनवला होता. हरमनचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लोप ठरले. त्यानंतर हरमन पूर्णपणे गायबच झाले ते शेवटी प्रियंका चोपडा च्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिसले होते. ते आता इतके वेगळे दिसतात की त्यांना कोणी ओळखू शकत नाही.५) शादाब खान – बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट शोले या चित्रपटातील गब्बर ही भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अमजद खानचा मुलगा शादाब खानने राजा की आयेगी बारात या चित्रपटामधून पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये शादाब राणी मुखर्जी सोबत काम केले होते. परंतु शाळा ब्लॉग त्याच्या वडिलांनी इतकी प्रसिद्धी मिळवता आली नाही.६) हिमांशू मलिक – मीरा नायर च्या ‘का’म’सू’त्र- द टेल ऑफ लव’ या चित्रपटांमधून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणाऱ्या हिमांशूला आता ओळखणे फार कठीण झाले आहे. एकेकाळी खूप हँडसम दिसणारे हिमांशू आता फारच बदलले आहेत. तुम बिन’ या चित्रपटामधून प्रसिद्धी मिळालेले हिमांशु ‘जंगल’, ‘ख्वाहिश’, ‘कोई आप सा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले होते.७) अविनाश वाधवन – १९८६ मध्ये आलेल्या ‘प्यार हो गया’ या चित्रपटांमधून पदार्पण करणारे अभिनेता अविनाश वाधवान ने ‘गीत’, ‘बलमा’, ‘जनून’, ‘दिल की बाज़ी’, ‘आई मिलन की रात’, ‘मीरा का मोहन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटांमधून तितकेसे यश प्राप्त झाले नाही. त्यानंतर बालिकावधू या प्रसिद्ध मालिकेमध्ये सुद्धा दिसले होते. मात्र त्यांच्या दिसण्यात खूपच बदल झालेला असून त्यांना ओळखता देखील येत नाही.८) चंद्रचुड सिंह – १९९६ मध्ये आलेल्या तेरे मेरे सपने या चित्रपटांमधून चंद्रचुड सिंहने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. परंतु सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मात्र त्यांना त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या माचिस या चित्रपटामुळे मिळाला. अभिनेता चंद्रचूड़ सिंह ने ‘दाग- द फायर’, ‘जोश’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आता ते फिल्मी दुनिया पासून दूर राहणे पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या लुक मध्ये फार बदल झाले आहेत.

९) फैसल खान – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाऊ असलेल्या फैसल खानने मेला चित्रपटामधुन चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु अमीर सारखे यश त्याच्या वाटेला येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी फिल्म इंडस्ट्री पासून दूर राहणे पसंत केले. आता त्यांचा लुक खूप बदलला आहे.१०) कृष्ण कुमार – चित्रपट निर्माता गुलशन कुमार यांचा भाऊ कृष्ण कुमार याने बेवफा सनम या चित्रपटामधून पदार्पण केले होते. या चित्रपटातील गाणी त्यावेळी खूप सुपरहिट ठरली आणि कृष्णकुमार यांना एक वेगळी ओळख मिळाली. परंतु ही ओळख त्यांना करिअरमध्ये पुढे येऊ शकले नाही. त्यामुळे आता चित्रपट सृष्टीत असून अज्ञात जीवन जगतात. आणि पूर्वीपेक्षा फार वेगळे दिसतात.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *