जगामध्ये असे खूप करोडपती व्यावसायिक आहेत जे प्रत्येक वस्तू खरेदी करण्यास सक्षम आहेत. अलिशान घरे, अलिशान गाड्या या गोष्टी त्यांना एक सामान्य वस्तू वाटतात. बॉलीवूडमध्येसुद्धा अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे राहणीमान अंबानी, टाटांपेक्षा काही कमी नाही. या अभिनेत्रींजवळ खूप पैसा आहे. आणि या पैशाच्या जोरावर त्यांनी आपल्या आवडत्या अलिशान वस्तू खरेदी केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींबद्दल माहिती देणार आहोत ज्या स्वतः एका प्राईवेट जेटच्या मालकीण आहेत.

१) माधुरी दीक्षित :- बॉलीवूडजगतावर एक दशकाच्या वर राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितकडे करोडोंची प्रॉपरटी आहे. माधुरीने श्रीराम नेणेसोबत लग्न केल्यानंतर बॉलीवूडमधून सन्यास घेतला होता. परंतु काही काळापूर्वी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. माधुरी दीक्षितजवळ स्वतःचे एक प्राईवेट जेट आहे. जे तिच्या स्वतःच्या मालकीचे आहे. ज्याची किंमत ३८ करोड इतकी आहे.२) शिल्पा शेट्टी :- बॉलीवूडमधील सुंदर आणि फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी बऱ्याच काळापासून चित्रपटापासून दूर आहे. आता ती फक्त इवेंटमध्येच आपल्याला पाहायला मिळते. शिल्पाचा लुक आणि तिची सुंदरता आजही आहे तशीच आहे. शिल्पाने आपल्या अभिनय कारकीर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शिल्पाच्या पतीचा खूप मोठा बिजनेस आहे. आणि शिल्पा एका प्राईवेट जेटची मालकीणसुद्धा आहे. या जेटची किमत जवळजवळ ४५ करोड ईतकी आहे.३) प्रियांका चोप्रा :- बॉलीवूड ते हॉलीवूडपर्यंत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती करोडोंची मालकीण आहे. प्रियांका एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते. तिच्याजवळ स्वतःचे एक प्राईवेट जेटसुद्धा आहे आणि त्याचबरोबर न्यूयॉर्कमध्ये स्वतःचे घर देखील आहे. प्रियांकाच्या जेटची किंमत जवळ जवळ ५३ करोड ईतकी आहे.
३) सनी लीओनी :- बॉलीवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लीओनीने खूपच कमी कालावधीमध्ये बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनीची लाइफस्टाइल खूपच रॉयल आहे. त्याचबरोबर मुंबईमधील बांद्रा येथे तिचे अलिशान घर देखील आहे. सनी एका प्राईवेट जेटची मालकीण आहे ज्याची किंमत जवळ जवळ ३५ करोड ईतकी आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.