कोणत्याहि मनुष्याच्या यशाच्या मागे त्याच्या कुटुंबाचा खूप मोठा हात असतो. कुटुंबातील लोकांच्या मदतीशिवाय कोणतेहि मोठे यश मिळवणे खूपच अवघड असते. आज बॉलीवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या यशाचे मुख्य कारण आपले कुटुंब मानतात. तर बॉलीवूडमध्ये असे सुद्धा कलाकार आहेत जे यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची साथ सोडली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी लोकप्रिय होताच आपल्या कुटुंबासोबत नाते तोडून टाकले होते.

अमीषा पटेल :- गदर आणि कहो ना प्यार है सारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अमीषा पटेल सध्या चित्रपटामध्ये कमीच पाहायला मिळते. काही काळापूर्वी तिने आपल्या कुटुंबावर आरोप लावले होते कि जेव्हा तिची आर्थिक स्थिती चांगली नव्हती तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिची मदत नाही केली आणि याचबरोबर तिने आपल्या वडिलांवर देखील मानसिक अत्याचार केल्याचा आरोप देखील लावला होता. यामुळे अमीषा पटेल आपल्या कुटुंबापासून नेहमी दूरच असते.कंगना रनौत :- कंगना रनौत कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. एकदा तिने आपल्या मुलाखतीमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध नसल्याचे सांगितले होत. तिचे म्हणणे होते कि तिच्या कुटुंबाने तिला बॉलीवूडमध्ये करियर बनवण्यसाठी सपोर्ट केले नव्हते. तसे तर आता तिचे कुटुंबियांशी नाते सामंजस्याचे आहेत.सुरवीन चांवला :- अभिनेत्री सुरवीन चांवला आपल्या बोल्ड सीनमुळे जास्त ओळखली जाते. ती पहिला कॉमेडी शो होस्ट करत होती. पण हेट स्टोरी २ मध्ये तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. हे तिच्या कुटुंबियांना आवडले नाही, याच कारणामुळे तिने आपल्या कुटुंबियांसोबत बोलणे बंद केले.रोहित शेट्टी :- आज रोहित शेट्टी बॉलीवूडमधील टॉप डायरेक्टर्सपैकी एक आहे. त्याला जास्तकरून अॅ्क्शन डायरेक्टर म्हणून ओळखले जाते. रोहित शेट्टीचे त्याचे सावत्र वडिलांसोबतचे नाते चांगले नाही आहे, तथापि आतापर्यंत त्याचे कारण समोर आलेले नाही.अरशद वारसी :- मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटामधून फेमस झालेल्या अरशद वारसीला आता कोणाच्याही ओळखीची गरज नाही. असे म्हंटले जाते कि तो बॉलीवूडमध्ये यशस्वी होताच त्याने आपला सावत्र भाऊ अनवर हुसैनसोबत बोलणे बंद केले होते. मात्र यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.