दुबईमधील बुर्ज खलिफा हि बिल्डींग जगातील सर्वात उंच बिल्डींग समजली जाते. हि बिल्डींग बाहेरून जितकी आलिशान दिसते त्यापेक्षा कित्तेक पटीने ती आतून देखील आलिशान आहे. प्रत्येक माणसाचे स्वप्न आहे कि दुबईमधील हि बिल्डींग आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात पहावी.

पण ते सर्वानाच शक्य नाही. त्याचबरोबर अनेक लोक या बिल्डींगमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहतात. फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार देखील याला अपवाद नाहीत. अनेक कलाकारांनी या बिल्डींगमध्ये आपले घर खरेदी केले आहे. अशाच काही कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.बुर्ज खलिफा २७०० फूट उंच असून हि जगातील सर्वात उंच इमारत आहे आणि हि जगभरातील आकर्षणाचे केंद्र आहे देखील आहे. या इमारत मधील फ्लॅट चा रेट १४०० डॉलर स्क्वेअर फुट पासून सुरुवात होते. १६३ माजली हि इमारत जगातील सर्वात जास्त मजली इमारत देखील आहे. इमारतीच्या ७६ व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच स्वीमिंग पूल आणि १५८ व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच मस्जिद आणि १४४ व्या मजल्यावर जगातील सर्वात उंच नाईटक्लब आहे. इतकेच नाही तर टॉवरमध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांची घरे आहेत.शर्लिन चोपडा :- शर्लिन चोपडा दुसऱ्या नंबरवर येते. शर्लिन चोपडा बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे देखील घर बुर्ज खलिफामध्ये ८२९ मीटरवर आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला तिने आपले घर इथे खरेदी केले होते. तिने एका मुलाखतीमध्ये याबद्द्द्ल माहिती दिली होती.

शर्लिनने म्हंटले होते कि माझे नेहमी स्वप्न असते कि मी ज्या शहरामध्ये जात राहते तिथे माझे अपार्टमेंट असावे. तर दुबई माझ्या आवडत्या शहरांपैकी एक आहे. शर्लिन चोपडाने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बुर्ज खलिफामध्ये घर खरेदी केले आहे. तर दुसरीकडे इंटरनेटवरील माहितीनुसार एक टू बेडरूम अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी देखील १५ करोड रुपयांची गरज आहे.मोहनलाल :- पहिल्या नंबरवर येतात मल्याळम चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता मोहनलाल, ज्याच्याजवळ दुबई स्थित बुर्ज खलिफामध्ये आपले एक घर आहे. त्यांचे घर या बिल्डींगच्या २९ व्या फ्लोरवर आहे. त्यांनी हे घर २०११ मध्ये खरेदी केले होते. मोहनलाल यांचे फिल्म प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन शिवाय रेस्टॉरंट आणि मसाला पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. त्यांना साउथचे अंबानी देखील म्हंटले जाते. त्यांची लाइफस्टाइल एखाद्या राजा महाराजापेक्षा कमी नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी हे सर्व आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे.शिल्पा शेट्टी :- बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. असे म्हंटले जाते कि तिच्या पतीने शिल्पा शेट्टीला २०१० मध्ये लग्नाचे गिफ्ट म्हणून २० करोडचा फ्लॅट गिफ्ट केला होता, जो बुर्ज खलिफामध्ये आहे. तथापि आता शिल्पाजवळ हा फ्लॅट आहे कि नाही याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.