सोनम कपूर, नेहा धुपिया, प्रियंका चोपडा, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे सेलिब्रिटी गेल्यावर्षी विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नानंतर बॉलीवूड मध्ये आता लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. काही बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांचे नाते सोशल मीडियावर कबूल केले आहे. प्रेमाचे वेगवेगळे स्टेट्स व सोबत दोघांचा फोटो अशा प्रकारे सोशल मीडियावर नाते कबुल करण्याचा ट्रेंड आला आहे. यावर्षीदेखील बॉलिवूडमधील अनेक भव्य लग्नसोहळे बघण्यास मिळतील. काळापासून एकमेकांसोबत नात्यात असलेले कपल कधी विवाह बंधनात अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. परंतु अनेकदा फक्त फोटोमध्ये एकत्र दिसल्यामुळे ते लग्न करणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरतात. त्यानंतर काही कार्यक्रमांद्वारे सेलिब्रिटी अशा चर्चांना पूर्णविराम देतात. अजून पर्यंत अधिकृत घोषणा जरी झालेली नसले तरी २०२० मध्ये हे सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

वरून धवन आणि नताशा दलाल – सध्याचा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरून धवन आणि नताशा दलाल हे दोघे एकमेकांना खूप वर्षांपासून डेट करीत आहेत. हे दोघे एकमेकांसोबत लग्न करणार असून यांच्या लग्नाची चर्चा खूप काळापासून पसरत आहेत. करन जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये वरुण ने नताशा सोबतचे नाते कबुल केले होते. यावर्षी वरुण ने न्यू इयर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत स्विझरलँड मध्ये सेलिब्रेट केले होते. वरुण आणि नताशा बॉलीवूड मधील एक परफेक्ट कपल आहेत. ती नेहमीच वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत असतात. असे बोलले जाते की या वर्षी एप्रिल महिन्यात हे दोघे लग्न करू शकतात.
रणबीर कपूर आणि आलिया भट – जेव्हापासून रणवीर कपूर आणि आलिया भट यांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली तेव्हापासूनच हे दोघे लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जाऊ लागले. गेले संपूर्ण वर्ष या दोघांच्या नात्याच्या चर्चा होत होत्या. काही दिवसांपूर्वीच या दोघांची लग्नपत्रिका देखील व्हायरल झाली होती. परंतु नंतर समजले की ते कार्ड खोटे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे लवकरच काश्मीरमध्ये लग्न करू शकतात. २०१७ मध्ये आलेला आलियाच्या राजी या चित्रपटाचे काही चित्रीकरण काश्मीरमधील घाटी मध्ये झाले होते. आलियाला ती जागा खूपच आवडली त्यामुळे रणवीर व आलिया चे लग्न त्याठिकाणी होऊ शकते असे म्हटले जाते. रणबीर व आलियाने अजून पर्यंत त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु नाताळा दरम्यान आलियाला रणबीर कपूरची आई नीतू व वडील ऋषी कपूर यांच्यासोबत बघितले गेले होते. याआधीही अनेकदा आलियाला रणबीर कपूरचा परिवारासोबत बघितले गेले होते. त्यामुळेच हे कपल अनेकदा चर्चेत असते.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा – अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ची लव स्टोरी सारखीच चर्चेत असताना दिसते. दोघांना अनेकदा एकमेकांसोबत सुट्टीचा आनंद लुटताना बघितले गेले आहे. यावर्षीही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दोघे गोव्याला सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. हल्लीच मलायका व अर्जुनचा एक फोटो सोशल मीडियावर भरपूर वायरल झाला त्यात मलायका अर्जुन कपूर ची किस घेत होती. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुद्धा उधाण आले आहे. मलायका व अर्जुन ने सोशल मीडियावर देखील यांच्या नात्याला स्वीकारलेले दिसते. त्यामुळे यांचे लवकरच लग्न होऊ शकते. मलायकाने लग्नाच्या एकोणीस वर्षानंतर अरबाज खानला २०१७ मध्ये घटस्फोट दिला.
फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर – अभिनेता गायक दिग्दर्शक असलेला फरहान अख्तर व अभिनेत्री शिबानी दांडेकर जात असल्याची चर्चा सर्वत्र होत असते. हे दोघे एकमेकांना एक वर्षाहून अधिक काळ डेट करीत आहेत यावर्षीच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दोघे लग्न करू शकतात. शिबानीची फरहान च्या मुलांसोबत देखील खूप चांगली मैत्री आहे. शिबानी फरहान पेक्षा सात वर्षांनी छोटी असून हे दोघे अनेकदा सुट्टी घालवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. सोशल मीडियावर ही अनेकदा दोघेपण एकमेकांसोबत चे फोटो शेअर करत असतात. फरहानचे या आधी २००० मध्ये अनुधा भबानी सोबत लग्न झाले होते परंतु काही कारणास्तव त्यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला.